You are currently viewing आसोली-टांक सोसायटीच्या चेअरमनपदी विश्वनाथ धुरी…

आसोली-टांक सोसायटीच्या चेअरमनपदी विश्वनाथ धुरी…

निवडणूक प्रक्रिया बिनविरोध; व्हाईस चेअरमनपदी अर्जुन राऊळ…

वेंगुर्ले

आसोली-टांक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. दरम्यान श्री सिद्धिविनायक ग्राम विकास पॅनलचे सदस्य विश्‍वनाथ धुरी यांची चेअरमन पदी निवड झाली आहे. तर व्हाईस चेअरमन पदी अर्जुन राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती माजी सभापती सुनील मोरजकर, माजी सरपंच सुजाता देसाई, अमृत धुरी, सदानंद गावडे, विजय धुरी, नंदा घाडी, बंटी कांबळी, आदींसह सोसायटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
चेअरमन पदी निवड झालेल्या श्री.धुरी यांचा गेली पंचवीस वर्षे सहकार क्षेत्रात दांडगा अनुभव आहे. गेली अनेक वर्षे चेअरमनपदाची जबाबदारी ते यशस्वीरीत्या हाताळत आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान गावच्या आणि सोसायटीच्या विकासासाठी मी नेहमीच झटत राहीन, असा विश्वास या प्रसंगी बोलताना श्री.धुरी यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा