वैभववाडी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी कुमार स्वामी यांची तर उपाध्यक्षपदी इंद्रजित परबते यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या शासनमान्य व समाजमान्य संस्थेची वैभववाडी तालुका शाखा स्थापन करण्यासाठी विशेष बैठक मंगळवार दिनांक २६ एप्रिल रोजी सायंकाळी ठिक ४.०० वा. वैभववाडी येथे संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव श्री.संदेश तुळसकर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची स्थापना, रचना, कार्यपद्धती व तालुका कार्यकारिणीची रचना याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देऊन वैभववाडी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी उपस्थितांमधून तालुकाध्यक्ष म्हणून कुमार स्वामी, उपाध्यक्ष इंद्रजित परबते, संघटक- जयवंत पळसुले, सहसंघटक- अतिश माईणकर, सचिव- तेजस साळुंखे यांची तर सल्लागार म्हणून शंकर स्वामी, शैलेंद्रकुमार परब, ॲड.प्रताप सुतार यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.पाटील यांनी सर्व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, श्री.संदेश तुळसकर, ॲड.प्रताप सुतार, इंद्रजित परबते, कुमार स्वामी, जयवंत पळसुले, तेजस साळुंखे, अतिश माईणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.