*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… गझल मंथन… गझल प्राविण्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ शोभा वागळे यांची अप्रतिम काव्यरचना*
*फोडा सारखी जपेन*
बाळ चिमुकले माझे
उदरात मी जपले
असो मुलगा मुलगी
भेद मुळी न मानले……१
जरी मुलगी म्हणूनी
नको झालीस सर्वांना
तरी गोळा उदरातला
आहे गर्व पालकांना……२
तळहातावर फोड
सांभाळीन मी सदैव
शिकविन सर्व कला
जन्म तुझा तो सुदैव…..३
वंश पणती घराची
दोन कुटुंबे जोडुनी
धन्य करील आईस
छान घराणे जुळुनी……४
सौख्य जोडशी मायेचे
लक्ष्मी दोन कुटुंबाची
म्हातारपणाची काठी
तू तुझ्या आईबाबांची…..५
जरी झुंज वादळाशी
द्यावी लागली आम्हाला
तरी बिनदास्त देऊ
तुला सदा जपायाला……६
शोभा वागळे
मुंबई