You are currently viewing कणकवलीतील बाबांच्या नावाने सुरू असलेल्या स्पोर्ट्स क्लब मध्ये सौदेबाजी वरून झाला राडा

कणकवलीतील बाबांच्या नावाने सुरू असलेल्या स्पोर्ट्स क्लब मध्ये सौदेबाजी वरून झाला राडा

मालवण विरुद्ध कणकवली आमने सामने

कणकवली येथील बाबांच्या नावाने सुरू असलेला सोशल स्पोर्ट्स क्लब गेली दोन वर्षे चर्चेत आहे. कणकवलीतील राजकीय व्यक्तींनी देखील या क्लब च्या विरोधात दंड थोपटले, परंतु खाकी वर्दीशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे या स्पोर्ट्स क्लब वर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. जगाला दाखवण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जाते, परंतु त्यापूर्वी खाकी वर्दीतील झारीतील शुक्राचार्य असणारे कारवाईच्या अगोदरच स्पोर्ट्स क्लबच्या मालकांना सूचित करतात. त्यामुळे जेव्हा कारवाई होते तेव्हा तिथे जुगार सारखे गैरधंदे आढळत नाहीत, व बाबांच्या स्पोर्ट्स क्लब ला पुन्हा एकदा गैरधंदे करण्यासाठी लायसन्स मिळते.
आज कणकवलीतील या स्पोर्ट्स क्लब मध्ये सौदेबाजी वरून जोरदार राडा झाला. स्पोर्ट्स क्लबचा मालक टिंगल मेंथेरो मालवण येथील खेळायला आलेल्या खेळाडूंच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे मालवण विरुद्ध कणकवली सामना स्पोर्ट्स क्लब मध्ये रंगला व दोन्ही पार्टीचे लोक आमने-सामने आले. आज संध्याकाळी ४.०० वाजता सदरची घटना कणकवली येथील बाबांच्या नावाच्या स्पोर्ट्स क्लब मध्ये घडली. कणकवली गेली तीस वर्षे जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कणकवली वासीयांनी अनेक राजकीय राडे अनुभवले आहेत. त्यांवरून कणकवली शहराची राज्यभरात राडे होणारे शहर म्हणूनच ओळखले जाते. यावेळी राजकीय राडा न होता, अवैद्य व्यवसायामुळे राडा झाला. त्यामुळे कणकवली शहरात अवैद्य व्यवसायांची राडे संस्कृती सुरू झालेली आहे. जिल्हाभरात काही शहरांमध्ये गावांमध्ये बाबांच्या नावाचा या स्पोर्ट्स क्लबच्या शाखा उघडलेल्या आहेत. या स्पोर्ट क्लबच्या विरोधात अनेक वेळा पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी झाल्या, आंदोलने, उपोषणे सुद्धा झाली, परंतु खाकीवर्दी सोबत असलेल्या “फेविकॉल का मजबूत जोड” मुळे क्लब वर मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही, उलट पाठीशीच घातले आहे. खाकी वर्दीने क्लबला पाठीशी घातल्यामुळे हळूहळू क्लब मध्ये आता राडेबाजी सुद्धा सुरू झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालून वेळीच राडेबाजीला आळा घालावा, अन्यथा पुन्हा एकदा कणकवली पेटून उठेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा