You are currently viewing जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पावशी मिटक्याची वाडी तालुका कुडाळ येथे दिमाखदार पद्धतीने साजरा झाला शाळा पूर्वतयारी अभियानाचा पहिला टप्पा

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पावशी मिटक्याची वाडी तालुका कुडाळ येथे दिमाखदार पद्धतीने साजरा झाला शाळा पूर्वतयारी अभियानाचा पहिला टप्पा

 

मंगळवार दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पावशी मिटक्याचीवाडी येथे दिमाखदार पद्धतीने शाही थाटात शाळापूर्व तयारी अभियानाचा पहिला टप्पा संपन्न झाला.
सन २०२२ – २०२३या शैक्षणिक वर्षांमध्ये स्टार्स प्रकल्पा अंतर्गत इयत्ता पहिली मध्ये दाखल होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासन *शाळापूर्व तयारी अभियान* हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळांमधून राबवत आहे.
सन 2019 पासून कोविड १९ या माहामारीचा सर्वच घटकांवर परिणाम झाला. लहान मुलांना तर पूर्ण बंदिस्त करून टाकले. मुलांच्या शिक्षणावर खूप मोठा परिणाम झाला. येत्या शैक्षणिक वर्षात दाखल होणाऱ्या मुलांना अंगणवाडी /बालवाडी शिक्षणाचा अनुभवच घेता आलेला नाही. या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी होणे आवश्यक आहे.
म्हणजे पुढे वाचन लेखनात त्यांना अडथळे येणार नाहीत.
भारताच्या या भावी नागरिकांच्या शिक्षणाची सुरूवात हसत-खेळत व आनंददायी पद्धतीने व्हावी यासाठी *शाळा पूर्वतयारी हे अभियान* संपूर्ण महाराष्ट्रभर राबवले जात आहे.

जि. प. शाळा पावशी मिटक्याची वाडी येथे हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती सावंत मॅडम, पदवीधर शिक्षक श्री परुळेकर सर व सातार्डेकर सर , उपशिक्षक श्रीमती ममता गावकर व श्रीमती आदिती मसुरकर या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. त्यांना शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडी सेविका दीपा फोंडके ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती सानिका देसाई ,शिक्षण तज्ञ श्री कोकित्कर सर ,श्री वैष्णव तेली व इतर सर्वच पालक, ग्रामस्थ यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले.
या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरला तो *सेल्फी पॉइंट*.शाळेसमोरच्या फुलझाडांच्या बागेत फुलांनी सजलेल्या या छोट्याशा शामियान्यात बसताना मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. या ठिकाणीच मुलांना फुगे देऊन, डोक्यात आकर्षक टोप्या घालून व शर्टला त्यांच्या नावाचे बिल्ले लावून त्यांचे औक्षण करण्यात आले. गोड खाऊ भरवण्यात आला .त्यामुळे मुलांचे चेहरे त्या फुलांप्रमाणे आनंदाने फुलले.ढोल-ताशाच्या तालावर घोषणा देत मुलांनी या मुलांसोबत मिरवणूक काढली.
त्यानंतर शाळेच्या हॉलमध्ये स्टेप १ नोंदणी २ शारीरिक विकास
३ बौद्धिक विकास ४ भावनिक विकास ५ भाषा विकास ६ गणन पूर्वतयारी ७ समुपदेशन अशी सात टेबले मांडली होती . प्रत्येक टेबलवर नेमक्‍या कोणत्या कृती मुलांनी करायच्या याच्या साठी आवश्यक असणारे साहित्य व थोडक्यात माहिती देणारी कार्डे आकर्षक पद्धतीने मांडली होती .फुलांच्या माळांनी सजवलेले प्रवेशद्वार व उपक्रमा संदर्भात माहिती देणारी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी काढलेली आकर्षक रांगोळी प्रत्येकाचे लक्ष खेचून घेत होती.
या सातही टेबलांवर पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांच्या कृतीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्रत्येक टेबलवर अंगणवाडी सेविका श्रीमती फोंडके व श्रीमती किशोरी नालंग ,श्री परुळेकर सर, श्री सातार्डेकर सर, श्रीमती ममता गावकर व श्रीमती आदिती मसुरकर हे शिक्षक व त्यांच्यासोबत स्वयंसेवक उपस्थित होते.सातव्या टेबलावर शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती सावंत मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व कृतींचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांमध्ये कोणती कौशल्य, क्षमता विकसित आहेत व अजून कोणत्या क्षमता त्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे यासंदर्भात उत्तम पद्धतीने पालकांचे समुपदेशन केले.
यावेळी इयत्ता पहिलीच्या पालकांमधून श्रीमती सिद्धी परब यांनी आपले मत मांडले .शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती सानिका देसाई यांनी या उपक्रमा संदर्भात समाधान व्यक्त केले. तसेच शिक्षणप्रेमी श्री कोकित्कर सर यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. पालकांना मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने पूरक असे मार्गदर्शन केले.
शेवटी उपशिक्षक श्रीमती ममता गावकर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा