You are currently viewing इचलकरंजीत भव्य वास्तू प्रदर्शनाचे आयोजन

इचलकरंजीत भव्य वास्तू प्रदर्शनाचे आयोजन

नितीन धूत , मयुर शहा यांची पञकार बैठकीत माहिती

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील केएटीपी ग्राउंड येथे २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत
आयकॉन स्टिल प्रायोजित भव्य वास्तू प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि दिव्य ११५ हून अधिक स्टॉलचा समावेश असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती वास्तू कमिटीचे चेअरमन नितीन धूत, विवेक सावंत, संजय रुग्गे, मयूर शहा, अनिल मनवाणी यांनी संयुक्तपणे पञकार बैठकीत बोलताना दिली.

बांधकाम विषयक सर्वांना उपयुक्त अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण भव्य वास्तू प्रदर्शन प्रथमच महाराष्ट्राच्या वस्त्रनगरीत होत आहे. असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स ॲण्ड आर्किटेक्ट, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी, क्रेडाई इचलकरंजी, इचलकरंजी सिमेंट डीलर वेल्फेअर असोसिएशन, इचलकरंजी बिल्डींग मटेरीअल सप्लायर्स असोसिएशन, बिल्डींग कॉंट्रॅक्टर असोसिएशन या सर्व बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर संस्थांच्या माध्यमातून व त्यांच्या संयुक्त विद्यमाने सदर वास्तू २०२२ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्थांमार्फत व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपून विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात.
सर्व स्तरातील नागरिकांना त्यांच्या स्वप्नातलं घर साकारता यावं, यासाठी या संस्थांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी शहरातील केएटीपी ग्राऊंडवर
२९ एप्रिल ते २ मे या कालावधीत वास्तू २०२२ हे बांधकाम विषयक प्रदर्शन संपन्न होत आहे.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आवाडे हे असणार आहेत.तसेच प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मागील २ वर्षात बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानात, साधनात झालेले बदल नागरिकांपर्यंत पोहचणार असून नक्कीच त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. त्यामुळे हे प्रदर्शन सर्वांसाठी जणू एक पर्वणीच ठरणार आहे. त्याचबरोबर सदर प्रदर्शनामध्ये गृह व बांधकाम प्रकल्प व नविन तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था व बँकांची माहिती, अर्थात वास्तू आणि वास्तूशी संबंधित सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनामध्ये ११५ हून अधिक स्टॉलअसणार आहेत. सदर प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विवेक सावंत, संजय रुग्गे, मयूर शहा, अनिल मनवाणी, रमेश मर्दा, बळीराम घायतिडक, संदीप जाधव, विकास चंगेडीया, सुधाकर झोले, प्रितीश शहा, विठ्ठल तोडकर, घनश्याम सावलानी, महांतेश कोकलकी, सुहास अकिवाटे, सय्यद गफारी, अभय पिसे, सचिन बोरा, मुकुंद ओझा, राजू पाटील, राजेंद्र खंडेराजुरी, गजानन ढवळे, महेश महाजन, कुमार माळी आदी मान्यवर अथक परिश्रम घेत असल्याचेही
वास्तू कमिटी चेअरमन नितीन धूत यांनी पञकार बैठकीत सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा