You are currently viewing कुडासे नदीतील गाळ काढा अन्यथा आंदोलन

कुडासे नदीतील गाळ काढा अन्यथा आंदोलन

शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांचा इशारा

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्याला गेली दोन वर्षे तिराळी नदीला येणाऱ्या पुरामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पुरामुळे तिराळी नदीत कुडासे वडाचे देवणे येथे भरपूर प्रमाणात गाळ साचल्याने नदीचे पाणी बागायती व शेतीत जात आहे. यामुळे शेती बागायतीचे अतोनात नुकसान होत असून संबधित तिराळी पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे, हा गाळ येत्या १५ मे पर्यंत न काढल्यास १६ मे रोजी तिराळी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दोडामार्ग शिवसेना तालुकप्रमुख गणेशप्रसाद गवस व शिवसेना पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता तिराळी पाटबंधारे विभाग यांना दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा