सिंधुदुर्गनगरी
सेवायोजन कार्यालये कायदा 1959 अन्वयेकलम 5 मधील तरतुदी नुसार शासकिय, निमशासकीय, खासगी अस्थापनेतील कर्मचाऱ्यांची माहितीचे तिमाही विवरणपत्र ई-आर-1 पत्येक तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांचे आत सादर करणे बंधन कारक आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने भरावे. दिनांक 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर-1 www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर दि. 30 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरावे. ज्या उद्योजक,अस्थापनांना ऑनलाईव्दारे विवरणपत्रे भरण्यास अडचणी येत असतील अशांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02362/ 228835 येथे संपर्क साधावा असे आवाहन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त,शा.गि.पवार यांनी केले आहे.