You are currently viewing रा. स्व संघ जनकल्याण समितीचे रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राचे भेडशी येथे करण्यात आले उद्घाटन..

रा. स्व संघ जनकल्याण समितीचे रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राचे भेडशी येथे करण्यात आले उद्घाटन..

दोडामार्ग

रा. स्व संघ जनकल्याण समिती ( महाराष्ट्र प्रांत) रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राचे उद्घाटन आज भेडशी येथे पार पडले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कॅ. सुर्यकांत टोपले व प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच लाखू खरवत , मुख्यवक्ते म्हणून डॉ. ठाकरे व डॉ. नवांगुळ उपस्थित होते.संपूर्ण प्रकल्पाची माहिती श्री. फणशिकर यांनी दिली.तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख सिद्धेश (भैय्या ) मोहन पांगम यांनी केले.यावेळी मान्यवरांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.व डॉ.ठाकरे यांनी विशेष मार्गदर्शन केले.समाज म्हणजे काय? सेवा, स्वार्थ, परमार्थ म्हणजे काय ? याची माहिती दिली.देशाची बाब म्हणजे जी आपण वेळात वेळ काढून लोकउपयोगी काम करतो तीच आहे.म्हणून हा देश घडवण्यासाठी आपल्याला तू मिलन एवढी समाजसेवा करा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी कार्यक्रम स्थळी उपसरपंच डांगी ग्रामपंचायत सदस्य संतोष भिसे, श्री अनिल मोरजकर, पंढरीनाथ देऊलकर, सनी केसरकर आनंद टोपले, राहुल गवंडळकर, राया भणगे,दादा मोरजकर,डॉ. तांबे ,तसेच रा. स्व संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गरजू व होतकरू रुग्णांना या केंद्रातून आवश्यक साहित्य घेऊन जाण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा