You are currently viewing कळसुली प्रा. आरोग्य केंद्राच्या कॉटर्सचे गेट नसल्याने गायीचे वासरू संडासाच्या टाकीत पडून मृत्यू

कळसुली प्रा. आरोग्य केंद्राच्या कॉटर्सचे गेट नसल्याने गायीचे वासरू संडासाच्या टाकीत पडून मृत्यू

स्थानिक ग्रामस्थांनमधून नाराजी व्यक्त

कणकवली:

कळसुली प्रा.आरोग्य केंद्रालगत असलेल्या कॉटर्सचे गेट तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे गायीचे वासरू संडासच्या टाकीत पडून मृत अवस्थेत आढळले. ही घटना गुरुवारी सकाळी प्रा.आरोग्य केंद्रातील परिसरात दुर्गंधी पसरली असता,स्थानिक ग्रामस्थांनी बंद अवस्थेत असलेल्या कॉटर्सच्या मागच्या बाजूस दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता,संडासच्या टाकीत मृत अवस्थेत गायीचे वासरू पडलेले आढळून आले. कॉटर्स चे गेट लावलेले असते तर गायीच्या वासराचा जीव वाचला असता. कळसुली प्रा.आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षतेमुळे ही घटना घडली असल्याचा ग्रामस्थानचा आरोप आहे. या घटनेला बेजबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यवाही करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रा.आरोग्य केंद्रातील कॉटर्सच्या परिसरात झाडी-झुडुपे व घाणीचे साम्राज्य,इमारतीची दुरावस्था, या सर्व समस्यांकडे आरोग्य अधिकारी डॉ. पोळ यांचाही दुर्लक्ष झाला आहे? तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासनाने लाखोंनी निधी खर्च करून उभारलेले कॉटर्स मध्ये कळसुली प्रा. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी राहणे बंधनकारक असताना,कर्मचारी राहत नाहीत ? असा सवाल स्थानिक ग्रामस्थांनमधून विचारला जात आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील वाढलेली झाडी,तसेच घाणीचे साम्राज्य वाढले प्राथमिक आरोग्य केंद्रा सभोवताली परिसरातील वाढलेली झाडी व स्वच्छता तसेच कॉटर्स चे तुटलेले गेट तातडीने आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष वेधावा अशी मागणी ग्रामस्थांनमधून केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा