तिसऱ्या घरट्यात कासवांची पिल्ले सोडण्यात आली समुद्रात
मालवण
आचरा समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या आलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या 78 पिल्लांना वनविभाग अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी सुर्यकांत आबा धुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करत मंगळवारी ५१ दिवसानी त्या अंड्यांपासुन बाहेर पडलेल्या पिल्लांची तिसरी बॅच आचरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या हस्ते समुद्रात सोडली.
आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती या पंधरवड्यात आतापर्यत एकूण चार पैकी तीन बॅच सोडण्यात आल्या यावेळी कांदळवन कक्षाच्या नेहा नार्वेकर, नारायण कुबल,अजय कोयंडे, प्रफ्फुल माळकर,गावकर तसेच किनाऱ्यावर दाखल असलेले पर्यटक यावेळी उपस्थित होते