You are currently viewing जिल्ह्यातील कृषी विभाग निद्रा अवस्थेमध्ये ?

जिल्ह्यातील कृषी विभाग निद्रा अवस्थेमध्ये ?

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विकासाकरिता मागील अनेक दशकापासून, *अनेक शासकीय तसेच खाजगी कृषी विद्यापीठ, शासकीय तसेच जिल्हा परिषद कृषी विभाग मोठमोठे पगार घेणारे कर्मचारी, तसेच अनेक एनजीओ सुद्धा, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासाकरिता कार्यरत आहेत.*
या माध्यमातून प्रचंड निधी कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांच्या नावाने खर्च केला जातो आहे?
परंतु प्रत्यक्षात मात्र हा निधी, किंवा शासकीय योजना अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही?
*ही बाब म्हणजे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीची शोकांतिका आहे?*

*तसेच या प्रशासनावर ज्यांचे नियंत्रण असायला हवे तेसुद्धा त्यांचेच भागीदार आहेत? म्हणून हे सर्व शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत घडत आहे.*

शेतकऱ्यांच्या विकासाकरिता सरकारच्या प्रचंड योजना आहेत, सर्व योजना चा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांना मिळायलाच पाहिजे. याकरिता *शेतकऱ्यांनी आता संघटित होऊन संघर्ष करावाच लागेल!* *यांचे नेतृत्व मी करेन असे प्रतिपादन, जिल्ह्यातील, ज्येष्ठशेतकरी नेते बाळासाहेब सावंत*
यांनी नर्सरी व्यवसायिक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात कुडाळ येथे बोलताना केले.

*जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किसान मोर्चाच्या संघटनेत सहभागी व्हावे. आणि जिल्ह्यामध्ये एक मोठी क्रांतिकारी शेतकरी संघटना उभी करावी, तर आणि तरच कृषी प्रशासनच काय! सरकारसुद्धा आपल्या अंगणात असेल!*
असे आवाहन *जिल्ह्यातील ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांनी शेतकऱ्यांना केले.*

*सत्यवान चव्हाण*
जिल्हाध्यक्ष
*कृषी विकास प्रतिष्ठान*

प्रतिक्रिया व्यक्त करा