जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.मेघा संखे, दुबई यांनी व्यक्त केलेल्या वाढदिवसाच्या काव्यरूपी शुभेच्छा
सैयमी, प्रेमळ सदा शांत
शितल चंद्रासम प्रतिमा जैशी
जिवनातला दिवस सोनेरी
वर्ष लागले तुम्हास ऐशी ………
सारा आईचा पुत्र लाडका
सदैव राखी मान आईचा
घेई काळजी नेहमी तिची
जशी दुधावरील मऊ साईचा……
लग्न गाठ सहचारीनिशी
आधरमेरू ने दिला हात
जसे दोन जीव एक प्राण
जीवनभर निभावली साथ ………
सदैव होता हात पाठीशी
खंबीर उभे मुलांसाठी
प्रेम बाबांचे दिले मायेने
छाया वटवृक्षाची सूनांसाठी ……….
आभाळमाया नातवंडांना
केला अखंड वर्षाव प्रेमाचा
मिळो आरोग्य तुम्हास नेहमी
असो आयुष्य शत जन्मीचा …….
*सौ. मेघा संखे, दुबई*