जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सत्तू भांडेकर यांची अप्रतिम काव्यरचना
एक पुस्तक आपणही लिहू
आयुष्याचा त्यात हिशेब ठेवू
शब्द शब्द त्यात पेरू आपण
शब्द बनून पुन्हा उगवू आपण
आठवणी साऱ्या जपून ठेवू
भूतकाळाचा मागोवा घेऊ
आपणही जरासे सोसू कळा
फुलवू गंधित शब्दांचा मळा
हृदयाचा वाचकांच्या ठाव घेऊ
शब्दरूपाने कायम जिवंत राहू
चला भावनांचे गीत होऊ
आपलीच आपण प्रीत होऊ
जोपासू जरासे आपणही छंद
दरवळू आपणच बनून गंध
एक पुस्तक आपणही लिहू
स्वतःच स्वतःचे स्वरूप पाहू
सत्तू भांडेकर, गडचिरोली
मो. न. 8459404546