You are currently viewing नांदोस सोसायटीवर शिवसेनेचा भगवा

नांदोस सोसायटीवर शिवसेनेचा भगवा

१३ पैकी १३ ही जागांवर शिवसेना पुरस्कृत गिरोबा विकास पॅनलचे उमेदवार विजयी

माजी चेअरमन अशोक नांदोसकर ठरले विजयाचे शिल्पकार

मालवण :

मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या नांदोस सहकारी विकास सोसायटीच्या निवडणूकीत शिवसेना पुरस्कृत गिरोबा विकास पॅनलने भाजपा पुरस्कृत गावविकास पॅनलचा धुव्वा उडवित एकतर्फी विजय मिळवला आहे. या सोसायटीच्या १३ पैकी १३ ही जागा गिरोबा विकास पॅनलच्या ताब्यात आल्या आहेत. माजी चेअरमन अशोक नांदोसकर हे विजयाचे शिल्पकार ठरले.

मालवण तालुक्यातील नांदोस विकास सोसायटीची निवडणूक शनिवारी घेण्यात आली. शिवसेनेच्यावतीने माजी चेअरमन अशोक नांदोसकर यांच्या नेतृत्वाखाली गिरोबा विकास पॅनल तर भाजपच्या वतीने गाव विकास पॅनल मार्फत ही निवडणूक लढवण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत पॅनेलने भाजप पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवला आहे. या सोसायटीवर विजयी झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे – सर्वसाधारण प्रवर्ग – शैलेश सुरेश बिबवणेकर (१२९), विश्वनाथ काशीराम डिकवलकर (१२९), महेश सदाशिव घाडीगावकर (१२७), बाळकृष्ण बमू खरात (१२४), गणेश कृष्णा मांजरेकर (१२९), अशोक आत्माराम नांदोसकर (१४६), विजय श्रीधर पार्टे (१३५), दीपक विष्णू शंकरदास (१३४), महिला प्रतिनिधी – सुहासिनी सखाराम चव्हाण (१४०), अपर्णा अनिल कदम (१३७), अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी – बाबल सावळाराम नांदोसकर (१४६), भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग – दशरथ धाकू खरात (१४१), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – गणेश अशोक नांदोसकर (१४९)

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचे शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा