You are currently viewing माझ्या बहिणाईची गाणी

माझ्या बहिणाईची गाणी

युवा कवी प्रविण खोलंबे यांची मराठी काव्यरचना.

माझ्या बहिणाईची गाणी |
काव्य मराठीस देती संजीवनी ||

गावातील मंदिरे ह्याच होत्या शाळा |
गाणी रचुनी फुलविला काव्य मळा ||

गाणी बहिणाईची वाहता गंगेचा पाट |
मना लावी जिव्हाळा शब्द मधुर दाट ||

गाणी जुन्यात चमकती बहिणाईची |
कानी नव्याने पडती ओवी अहिराणीची ||

माती,मातीत पेरिलं अनमोल शब्दधन |
बोली अहिराणीत भरलं हे काव्यधन ||

माझ्या बहिणाईच्या गाण्यात निसर्ग प्रतिमा झिरपते |
ओव्या वाचता, वाचता त्यातुनी मज बहिणाई दिसते ||

कवी प्रविण खोलंबे.
मो.८३२९१६४९६१.

प्रतिक्रिया व्यक्त करा