You are currently viewing पाडलोस मधील शेतकऱ्याचे १ मे रोजी उपोषण

पाडलोस मधील शेतकऱ्याचे १ मे रोजी उपोषण

तिलारीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे शेतजमिनीचे नुकसान : नुकसानग्रस्त राजू माधव

पाडलोस-रोणापाल भागातून जाणाऱ्या तिलारी पाटबंधारे प्रकल्पालगत असलेली शेतजमीन अधिकाऱ्यांच्या अनास्थेपोटी कालव्यात कोसळली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत संरक्षक भिंत बांधण्याचे ठोस आश्वासन देत नुकसानभरपाई देणार असल्याचे सांगितले होते. परंतु एक वर्षांचा कालावधी उलटूनही भरपाई तर सोडाच पण संरक्षक भिंतही बांधली गेली नाही. त्यामुळे आपली उरलीसुरली शेत जमीन वाचविण्यासाठी व भरपाई मिळण्यासाठी आपण १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पाडलोस येथेच उपोषणास बसणार असल्याचे निवेदन शेतकरी राजू माधव यांनी तिलारी लघुपाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना दिले आहे.

गेल्यावर्षी जून महिन्यात झालेल्या पावसात शेतकरी राजू माधव यांचीजांनी कालव्याच्या वरच्या बाजूने पाण्याच्या वरच्या प्रवाहात वाहून गेली पाऊस पडण्यापूर्वी शेतीच्या खालच्या बाजूने संरक्षकभिंत बांधून घेणे आवश्यक असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले होते परंतु पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास न करता अतिशय बेजबाबदारपणे अधिकाऱ्यांनी काम केल्यामुळे माझ्या शेतीचे नुकसान झाले आहे . सदर घटनेची अनेक वेळा अधिकाऱ्यांना कल्पना दिली त्यानुसार नुकसान भरपाई देणायचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले मात्र त्याचे समरण अधिकऱ्यांनाच राहिले नसल्याचे राजू माधव यांनी सांगितले .

दरम्यान तिलारी पाटबंधारे घटनेची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने या वर्षी पावसाळ्यात उरलीसुरली जमीन सुद्धा वाहून जाणार आहे . त्यामुळे आपल्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे . माझी शेतजमीन वाचविण्यासाठी नाईलाजास्तव १ मे रोजी महाराष्ट्र दिनादिवशी उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन श्री माधव यांनी अभियंत्यांना दिले .

प्रतिक्रिया व्यक्त करा