पुणे:
लातूर तालुक्यातील गातेगावचे सुपुत्र व औरंगाबादच्या छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.सुशिल सातपुते यांना तेजभूषण कृषीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच आळंदीत प्रदान करण्यात आला.
तेजभूषण बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्थेच्या काव्यधारा साहित्य कला मंचद्वारा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर व नगरसेवक प्रकाश कुर्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संमेलनाध्यक्ष डाॅ.ख.र.माळवे, स्वागताध्यक्ष शकील जाफरी उपस्थित होते. याप्रसंगी पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे, माजी विरोधी पक्षनेते डी.डी.भोसले, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, राष्ट्रीय कवी पुरुषोत्तम महाराज हिंगनकर, तेजभूषण संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ भगीरथ,उपाध्यक्ष सुरेखा भगीरथ, सचिव भूषण बिऱ्हाडे,कोषाध्यक्ष तेजस्विनी भूषण बिऱ्हाडे,सहसचिव महेश सपकाळे,सल्लागार गोपाळ कळसकर,पुणे जिल्हा अध्यक्ष भारती नरवेलकर,पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय नरवलेकर,महिला सदस्य निलिमा सपकाळे,अनमोल सहकार्य शुभम धाबे,महेश वानखेडे,वामन सपकाळे, इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे उपस्थित होते