You are currently viewing कणकवली सहा. पोलीस निरीक्षकांची मालवण येथे बदली..

कणकवली सहा. पोलीस निरीक्षकांची मालवण येथे बदली..

कणकवली :

 

कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांची आज तडकाफडकी बदली झाली.त्याची ही बदली राजकीय हस्तक्षेपा मुळे झाली असावी अशी चर्चा आहे.सागर खंडागळे यांनी गेली अडीच वर्ष कणकवली पोलिस ठाण्यात यशस्वीरित्या काम केले. अनेक सेन्सिटिव्ह प्रकरणे व निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यात सागर खंडागळे यांचा मोठा हात आहे.

सागर खंडागळे हे गेली अडीच वर्षे कणकवली पोलिस उपनिरीक्षक म्हणून उत्तम रित्या कार्यभार सांभाळत होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच गुण्याचा उलगडा केला होता.तसेच गुन्ह्यांचा तपासही प्रत्यक्ष हजर राहून करत असायचे. अशा या कार्यतप्त अधिकाऱ्याची बदली होण्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा