You are currently viewing मालवण येथील रक्तदान शिबिरात ३४ जणांनी बजावला रक्तदानाचा हक्क

मालवण येथील रक्तदान शिबिरात ३४ जणांनी बजावला रक्तदानाचा हक्क

जिल्हा आरोग्य विभाग आणि ग्लोबल रक्तदाते मालवण यांचे आयोजन

मालवण

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग व ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने गुरुवारी मामा वरेरकर नाट्यगृहात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ३४ जणांनी रक्तदान केले.

मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत रक्तपेढी ओरोस जिल्हा रुग्णालय यांच्या सहाय्याने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ अमित आवळे, शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, आरोग्यसेवक राजेश पारधी, उद्योजक राजन परुळेकर, लोकमान्य सोसायटीचे मॅनेजर नितीन मांजरेकर, ग्लोबल रक्तदाते संघटक अमेय देसाई, विकास पांचाळ, राजा शंकरदास, नेहा कोळंबकर, राधा केरकर , सूर्यकांत कदम आदी उपस्थित होते. यावेळी शतकवीर रक्तदाते गणेश आमडोसकर यांचा डॉ. बालाजी पाटील यांच्याहस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या शिबिरासाठी जिल्हा रक्तपेढी ओरोसच्या डॉ. अमित आवळे, प्रांजल परब, सुनील वानोले, नितीन गावकर, सुरेश डोंगरे, नंदकुमार आडकर यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा