*वृत्त संकलनासाठी गेले होते विनायक गावस*
महावितरणच्या सावंतवाडी उपकेंद्रात शिरून यंत्रचालक आनंद गावडे यांच्या सोबत बाचाबाचीची घटना काल रात्री घडली होती. या घटनेत विनाकारण विनायक गावस यांचं नाव गोवण्यात आलं आहे. या FIR मधून पत्रकार विनायक गावस यांचं नाव वगळण्यात याव अशी मागणी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने केली आहे.
विनायक गावस यांचं नाव FIR मधून मागे घ्याव अशा मागणीच निवदेन पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना देण्यात आले.
या प्रकरणात विनायक गावस यांचं नाव गोवण्यात आलं आहे. विनायक सारख्या निर्भीड पत्रकारावर अशा प्रकारचा गुन्हा विनाकारण दाखल होत असेल ते गंभीर असल्याच सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी सांगितले.
माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही जर चुकीच्या पद्धतीने केवळ बातमी दिली म्हणून जर गुन्ह्यात नाव गोवल गेल असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल असं सांगितलं.
दरम्यान, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीनेही पत्रकार विनायक गावस यांचं नाव FIR मधून वगळण्यात याव अशा मागणीचं निवदेन सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना देण्यात आलं. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण मांजरेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य हरिश्चंद्र पवार, कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, रामचंद्र कुडाळकर, सिताराम गावडे, भरत केसरकर, प्रसन्न गोंदावळे, रोहन गावडे, विनय वाडकर, आदि पत्रकार उपस्थित होते.