You are currently viewing झरोका…

झरोका…

माझी लेखणी साहित्य समूह सदस्य श्री.जगन्नाथ खराटे यांचे समाजप्रबोधनपर लेखन…

झरोका…

कोसला…

अगदी लहानपणी गावी असतानाची गोष्ट,, गुलाबी थंडीचे दिवस,अन् सकाळची वेळ,अशा‌ वेळेचं आल्हाददायक वातावरन, अन् अशा वेळी निसर्गाच्या सानिध्य असलं म्हणजे एक अप्रतिम असं स्वर्गसुख मिळतं.पन खरंच हे स्वर्गीय सुख काय आहे ते अनुभवल्या शिवाय कळंत नाही.अन् अशा वेळी जरा बाहेर फेरफटका मारायला जाउ असं वाटलं,मग निघालो जवळपास असलेल्या मळ्यात. वाटेनं जातांना झाडाझुडुपांमध्ये पाखरांचा किल बिलाट सुरू होता. पन् तो किलबिलाट हवाहवासा वाटंत होता जणु एक सुरेल संगीत वाजत आहे असं वाटे, वाटेवरती झाडा झुडपांना घट्ट विळखे घालुन काही वेली झाडाभोवती दिसतं होत्या
त्या न्याहळंताना अचानक वेलीवरती
लटकतं असलेला तो “कोसला नजरेस पडला.अन् मला तो हवाहवासा वाटला तिथे जाऊन तो हळुच वेलिवर काढून घेतला.अन् त्या मऊ मुलायम कोसल्याकडे पाहत विचार करु लागलो..
खरंच,मानसाचं, संपुर्ण जीवन ह्या कोसल्यासारखंच आहे असं वाटुन गेलं.अन् ते मानसानंच बनवलं आहे असं मला वाटलं. त्या कोसल्यातल्या किड्यासारखं..
खरंतर, कोणताही सजीव प्राणी हा सुख भोगण्यासाठी जन्माला आला आहे स्रुष्टित..अन्,जो, तो,आपल्या कर्मफलानुसार सुखदुःख भोगतो.अन् निसर्गाच्या नियमानुसार चालतो.अन, आपल्या कोसल्यांतंच राहुन जीवन जगतो.अगदी,मनुष्य सुद्धा…‌ ……. पन्, इतरांकडे आहार, निद्रा भय मैथुन ह्या चांरंच गोष्टी आहे,पन् मानसाकडे, मन, बुद्धी, व कर्मस्वातंत्र्य असल्याने तो चांगलं कर्म करुन चांगलं फळ मिळवु शकतो्..अगदी,आनंदाने मनमुक्त जिवन जगुन शकतो… पन् तसे होत नाही..
ईतर जिव तसे करु शकत नाही. ते सर्व
आपल्या आखुन दिलेल्य सिमारेषेतंच राहु शकतात‌.ते आपल्या भोवती असलेल्या कवचामध्येच अडकुन राहतात.अगदी कोसल्या सारखं..
मग मानव हा असा का वागतो,?ह्याचं कारणं,, त्याला मिळालं आहे मन, त्या मनाचांच हा स्वच्छंदीपना आणि त्याने आपल्याभोवती घट्ट बांधले आहे अगदि सुक्ष्म अन् असंख्य असे धागे, आशा,आकांक्षेचे… अन् आपनहुन अडकुन पडला आहे मायामोहाच्या कोसल्यांत..
ह्या व्यवहारी जगात तर जागोजागी दिसत आहे कोसले, जातीभेदाचे, धर्म अधर्माचै, उचनिचचे, लहानथोराचे, गरिबश्रीमंतीचे, मोठेपणाचे,रागलोभाचे किंबहुना द्वेषाचे ,असुयेचे.. अगदी मोजता येत नाही इतके व्यापक आहे हे.. असे हे अनेक विविध कोसल्याचे अनेक प्रकार पहायला मिळतात ह्या जगात,…
खरं तर हा कोसला बनवला आहे यत्किंचित अशा किड्यांनं,ईवलासा भुंगा अगदी लहानशी अळी घेवुन येतो खाण्यासाठी,अन् तिला दडवुन ठेवतो पानाच्याआड,, व निघुन जातो…पन ती अळी घाबरुन गर्भगळीत होते व आपल्या रक्षणासाठी, आपल्या तोंडातुन लाळ सोडुन अविरत कष्ट करुन ईवल्याशा अनेक धाग्यांचा एक मजबुत कोसला बनवुन घेते आपल्या भोवती.पन बाहेर जायला वाट ठेवंत नाही..अन् शेवटी मरुन जाते……..
अगदी मनुष्य सुद्धां असंच आहे.. मरणाच्या भितीनं मनुष्य, ह्या जगात आपन सुरक्षीत राहण्यासाठी माया ममतेचा मजबुत कोसला बनवतो.अन त्यात अडकुन आपलं अस्तित्व नष्ट करतो.शेवटी अविचाराने बनवलेला हा कोसला आत्मघात करतो त्याचा,अन् मनुष्य, आपल्या चैतन्यमयी अशा मुळ स्वरुपापासुन दुरावतो…

जगन्नाथ खराटे- ठाणे ✍️..
२१एप्रिल२२…

प्रतिक्रिया व्यक्त करा