जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री भाग्यश्री कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना
वसं एक गंध, मनास भावणारा
वसंत एक धूंद, मंद गार वारा
वसंत नव पालवी ,बहर चैतन्याचा
वसंत ऋतु भासवी, खेळ हा ऊन्हाचा
वसंत गोड मधुर ,जणू फळ रसाळ
वसंत क्षण आतुर ,छेडी कसा खट्याळ
वसंत एक गाणे, मृदू कोकिळ स्वर
वसंताचे असणे , जणू प्रेमाची लहर
वसंत एक मोह, दिलास लागणारा
वसंत समारोह, प्रसन्न करणारा
वसंत एक चाहूल, सुरेख नव सृष्टीची
वसंत एक पाउल, ओढ़ नव्या भेटीची
वसंत अती लोभस , रूप एक गोजिरे
वसंत असे राजस, सारेच भासे साजिरे
वसंत एक सौन्दर्य ,चढे धरणीला साज
वसंत एक ऐश्वर्य , म्हणुन तो ऋतुराज
*****************************
सौ. भाग्यश्री निलेश कुलकर्णी
बावधन, पुणे