सावंतवाडी
येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित भव्य आरोग्य मेळाव्याला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी रुग्णांची आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सर्व आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गरजू रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला.
या मेळाव्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर,डॉ. महेश खलीपे, तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जाधव, डॉ. गिरीशकुमार चौगुले, डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, शिवसेनेचे अशोक दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय सावंत, डॉ. संदीप सावंत,स्त्रीरोतज्ज्ञ डॉ. मृदुला महाबळ, डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर,शल्यचिकित्सक डॉ पावसकर , डॉ गिरीश चौगुले,भिषक, डॉ. निर्मला सावंत, डॉ अभिजीत चितारी,मेंदुविकर तज्ज्ञ डॉ.अंबापुरकर, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ लीना परुळेकर,अस्थिरोगतज्ञ डॉ कश्यप देशपांडे, डॉ रेवांसिद्ध खटावकर,त्वचारोग तज्ज्ञ डॉ चेतन म्हडगुत,दांतचिकित्सक डॉ समीर धाकोरकर,आयुष डॉक्टर्स आहारतज्ज्ञ श्रीमती पाखरे आदींनी रुग्णांची तपासणी केली.