वैद्यकीय अधीक्षक संदीप सावंत : मनसेच्या प्रयत्नांना आले यश
सावंतवाडी
येथील उपजिल्हा रुग्णालयातील गेली दोन-तीन महिने बंद असलेले शवागृह आता सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक संदीप सावंत यांनी दिली असून मनसेच्या प्रयत्नांना यश आले आहे मनसेच्या शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी मार्च महिन्यात बंद फ्रिजर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता त्यानंतर आज पुन्हा वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार उपतालुका अध्यक्ष प्रकाश साटेलकर संतोष भैरवकर शहर सचिव आकाश परब अभय देसाई संदेश शेट्ये आदी उपस्थित होते
येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार संदीप सावंत यांनी स्वीकारल्यानंतर आज शहर मनसेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन श्री सावंत यांचे अभिनंदन करण्यात आले पदभार स्वीकारल्यानंतर योग्य पद्धतीने सुरू असलेल्या कामाबद्दल त्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तोंड भरून कौतुक केले यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी डॉ वजराटकर देखील उपस्थित होते संदीप सावंत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बऱ्यापैकी पाण्याची समस्या दूर झाल्याचे उपस्थित डॉक्टरांनी सांगितले पाणीटंचाईच्या समस्ये बरोबरच इतरही समस्या आपण योग्य पद्धतीने हाताळून दूर कराल अशी अपेक्षा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत कोणतीही मदत लागल्यास निश्चित सहकार्य करू असे त्यांनी सांगितले