संगमनेर :
आज २ अॉक्टोबर रोजी संगमनेर येथील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनाला सुरूवात झाली आहे.
नाशिकमध्ये शनिवारी (२६ सप्टेंबर) रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. २ आॅक्टोबर ला खासदार, आमदार यांच्या घरासमोर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मराठा आरक्षणासाठी पुढील रूपरेषा व आंदोलनाबाबत चर्चा होऊन तालुकास्तरावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला. त्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली.
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शिवाजीनगर येथील घरासमोर ठिया आंदोलन करण्यात आले असून, या आंदोलनात महसूल मंत्री थोरात यांच्या भगिनी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, त्यांचे पती आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील सहभागी झाले आहेत.