सिंधुदुर्गनगरी
स्काऊट गाईट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा 22 फेब्रुवारी हा जन्मदिवस संपूर्ण जगभरात चिंतन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्या जयंती निमित्य भारत स्काऊट आणि गाईट जिल्हा कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील इ.1ली ते 4 थी,कब/ बुलबुल व इ. 5वी ते 7 वी स्काऊट/गाईट करिता शाळास्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा तालुकास्तरावरील व जिल्हास्तरीय निकाल खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे.
कब/बुलबुल चित्रकला स्पर्धा तालुकास्तीय निकाल प्रथम क्रमांक, कणकवली तालुक्याती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव नं 1 येथील कुसूम सुधीर तांबे. देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक पडेलगावकर येथील अथर्व प्रशांत वारीक. वेंगुर्ला तालुक्यतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उभादांडा नं.3 येथील काव्या सुशांत कुर्ले. कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाट गजानन येथील निधी प्रशांत चव्हाण . वैभवाडी तालुक्यातील विद्यामंदीर सांगुळवाडी नं. 1 शाळा येथील आयुषी प्रफुल्ल जाधव. सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माडखोल नं.2 धवडकी येथील सुमेग गुरुनाथ राऊळ. मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके नं.1 येथील जानवी धमेंद्र चौकेकर.
स्काऊट,गाईड चित्रकला स्पर्धा तालुक्यास्तरीय निकाल प्रथम क्रमांक विद्यार्थी, कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव मधलीवाडी येथील आर्या योगेश परब. देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकेश्वर नं.1 येथील कुणाल भास्कर पेडणेकर. वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उभादांडा नं1 येथील आर्या संदेश मोचेमाडकर कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदुर्ले नं 1 येथील मकरंद नरहरी सडवेलकर. वैभववाडी तालुक्यातील विद्यामंदीर सांगुळवाडी नं1 येथील जागृती योगेश पांचाळ सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी न.4 येथील साईश तुकाराम बांदेकर .
स्काऊट गाईट चित्रकला स्पर्धा जिल्हास्तरीय निकाल कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडोस नं.1 येथील विद्यार्थीचे प्रथम क्रमाक यश मधुकर शिंदे. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदुर्ले नं.1 विद्यार्थी व्दितीय क्रमाक मकरंद नरहरी सडवेलकर. तसेच तृतीय क्रमांकाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरुन माडयाचीवाडी येथील विद्यार्थी ऋतुजा उदय गावडे यांची निवड झाली आहे.
कब/ बुलबुल चित्रकला स्पर्धा जिल्हास्तरीय निकाल, कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाट गजानन येथील हर्षदा गणेश जोशी यांचा प्रथम क्रमांक तर देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडेलगावकर येथील अथर्व प्रशांत वारीक यांची व्दितीय, तसेच कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नांदगाव नं1 येथील आयशा अल्ताज साटविलकर यांची तृतीय क्रमांकची निवड करण्यात आली आहेत.
या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे निरिक्षण संदीप चिवूलकर, कुडाळ हायस्कूल कुडाळ व देवदत्त अरदतकर, न्यु इंग्लिश स्कूल कसाल यांनी केले. तरी सर्व विजेत्या स्काऊट्स गाईटस व कब बुलबुल यांचे जिल्हा कार्यालयाच्या वतीने हार्दीक अभिनंदन केले.