You are currently viewing जिल्ह्यात महाविकास आघाडीत समन्वय नसल्याने राष्ट्रवादी पदाधिकारी नाराज;लवकरच तिन्ही पक्षांची बैठक : शेखर माने

जिल्ह्यात महाविकास आघाडीत समन्वय नसल्याने राष्ट्रवादी पदाधिकारी नाराज;लवकरच तिन्ही पक्षांची बैठक : शेखर माने

सावंतवाडी

सिंधुदुर्गातील महाविकास आघाडी मध्ये समन्वय नाही . येथील राष्ट्रवादीच्या पदाधि काऱ्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी समन्वय समितीच्या माध्यमातून तीनही पक्षांची बैठक घेऊन मार्ग काढू , असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक शेखर माने यांनी सावंतवाडी येथे दिला . राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा समारोप दि . २३ एप्रिलला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात होणार आहे . त्यासं दर्भात नियोजन करण्यासाठी याठिकाणी जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली . याप्रसंगी विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री . माने बोलत होते.

यावेळी सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, काका कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, आत्माराम ओटवणेकर, अनंत पिळणकर, भास्कर परब, नजीर शेख, सचिन पाटकर, शिवाजी घोगळे, मकरंद परब, डॉ . साठे, रवींद्र चव्हाण, ईफ्तिकार राजगुरू, प्रफुल्ल सुद्रीक, अफरोज राजगुरू, नितीन कळंगुटकर, आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधि कारी – कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचा समारोप कोल्हापुरात होणार आहे. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी सिंधुदुर्गा तून ५ ते ७ हजार कार्यकर्ते जाणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे श्री. माने यांनी सांगितले. बैठकीदरम्यान काही पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही. मित्र पक्ष आम्हाला विश्वासात घेत नाहीत, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यादृष्टीने आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असून महाविकास आघाडीमध्ये समन्वय राखण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

त्या समितीच्या माध्यमातून तीनही पक्षाची बैठक घेऊन समन्वय राखण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. येथील राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना श्री.माने म्हणाले , राज ठाकरे यांची भूमिका ही नाट्यमय आहे. ती भूमिका म्हणून ठाम नाही. त्यामुळे त्याकडे सर्वांनी मनोरंजन म्हणून पहावे. केंद्र सरकारबाबत बोलताना ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून केंद्रातील भाजपा सरकारची भूमिका विरोधी नसून केवळ कुरघोडी आहे. राज्यातील वाढत्या महागाईला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला .

प्रतिक्रिया व्यक्त करा