ओसरगाव शाळा नं १ मध्ये संविधान संवादशाळा संपन्न
कणकवली
लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित केलेल्या संविधान संवादशाळा जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगांव नं.१ येथे संविधान संवादक सुजय स्वप्नाली सत्यवान बोलते होते. आपल्या भारतीय संविधानाचा कलम २१(अ)मध्ये ६ते१४ वयोवर्ष मुला मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण दिलचे पाहिजे. अशी तरतुद आहे . ह्या कलमाची मूहर्तवेढ १८८२ साली महात्मा ज्योतीबा फुलेंनी हंटर कमिशन समोर शिक्षणाची साक्ष देताना बोलत होते.
ह्या संवादशाळेची सुरूवात सुनील स्वामी लिखीत भारताचा प्राण आहे संविधान ह्या अभंगाने करण्यात आली. तुकोबा रा़यांनी दिलेल्या पर्यावरण संरक्षण संदेश वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हा भारतीय संविधानाचा कलम ४८(क) मध्ये पर्यावरणाचे संरक्षण रक्षण करण्यानुसार आहे असेही ते बोलत होते. ही संवादशाळा संविधान संवाद अभियान २०२२ विचार महामानवांचा, संवाद संविधानाचा ह्या अंतर्गत होती. ह्या संवादशाळेमध्ये शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुप्रिया अपराध व प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर कदम, सहकारी शिक्षिका राजश्री तांबे, शीतल दळवी, प्रशालेचे केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी आदी उपस्थित होते. केंद्रप्रमुख हरकुळकर यांनी ह्या संवादशाळेच खूप कौतुक केले. शालेय वयापासूनच विद्यार्थ्यावर संविधानीक मूल्यांची रुजवणूक झालीच पाहिजे असेही ते बोलते होते.
ह्या संवादशाळेसाठी केंद्राचे संवादक सुनील स्वामी, संजय रेंदाळकर, राजवैभव शोभा रामचंद्र, रेश्मा खाडे, हर्षल जाधव, कृष्णात स्वाती, तुषार चोपडे, शितल यशोधरा, शर्मिला जोशी, प्रमोद गायधनी, मिनाक्षी शकताव, अमोल कदम, निलेश साबळे, महेश बिराजदार, मुक्ता निशांत, दिपाली कांबळे, सुमिक प्रतिभा संजय, व आम्ही संविधान संवादक टिम महाराष्ट्रचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.