You are currently viewing आरवली येथील वेतोबा मंदिरात भागवत सप्ताह

आरवली येथील वेतोबा मंदिरात भागवत सप्ताह

वेंगुर्ला :

 

आरवली गावातील जागृत देवस्थान श्री देव वेतोबा मंदिर प्रांगणात गुरुवारी २१ ते बुधवार २७ एप्रिल दरम्यान ब्राह्मण ऐक्यवर्धक संघ आरवली पंचक्रोशी यांच्यावतीने आणि श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी, गावकर मंडळी, ग्रामस्थ आणि भक्तमंडळी यांच्या विशेष सहकार्याने भव्य श्रीमंत भागवत सप्ताह पारायण निरूपण व प्रवचन सोहळा होणार आहे. ब्राह्मण ऐक्यवर्धक संघाचे पदाधिकारी आणि श्री देव वेतोबा देवस्थान समितीचे विश्वस्त यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप पणशीकर यांनी ही माहिती दिली.

 

महर्षी व्यास विरचित १८ पुराणांमधील एक श्रेष्ठ असा ग्रंथ म्हणून श्री भागवत पुराण किवा श्रीमद्भागवत या ग्रंथाची गणना होते. आरवली पंचक्रोशीतील रयतेला त्यांचे महात्म्य, चारित्र्याविषयी माहिती व्हावी, बोध व्हावा या हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला देव वेतोबा देवस्थान कमिटी अध्यक्ष जयवंत राय, वहिवाटदार मिलिंद दळवी, सचिन दळवी, डॉक्टर प्रसाद साळगावकर, मंडळाचे शेखर पणशीकर, रवींद्र पणशीकर, प्रमोद खांडेकर उपस्थित होते. या सोहळ्याचे कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

 

🔹बुधवारी २० रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री देव मारुती शिरोडा ते श्री देवी सातेरी मंदिर, देव वेतोबा मंदिर दरम्यान श्री भागवत ग्रंथ दिंडी, श्रीकृष्ण रथ शोभायात्रा

 

🔹गुरुवारी २१ रोजी श्री देव वेतोबा मंदिरात गावकर मानकरी पुरोहित, ब्रम्हावृंद, विश्वस्त मंडळींच्या उपस्थितीत मंगलाचरण, श्री महागणपती पूजन, प्राकार शुद्धी, सरस्वती पुण्याहवाचन, मातृकापूजन, श्री भागवत महापुराण ग्रंथ सहिता वाचन, वेदमूर्ती भालचंद्र जोशी व वेदमूर्ती श्रीनाथ रिंग, सायंकाळी भागवताचार्य सिद्धयोगी प. पूज्य हरिभाऊ निटूरकर जोशी महाराज यांची श्री भागवत कथा निरूपण, प्रवचन, आरती, तीर्थप्रसाद, रात्री भजने.

 

🔹 २१ ते २७ एप्रिल दररोज सकाळी भागवतपीठ देवतापूजन आणि भागवत ग्रंथ सहिता वाचन, सायंकाळी ४.३० ते ७.३० वाजता भागवताचार्य सिद्धयोगी प.पूज्य हरिभाऊ निटूरकर यांचे निरूपण व प्रवचन, २५ रोजी ‘गोवर्धन पर्वत’, २६ रोजी ‘रुक्मिणी स्वयंवर देखावा’ होणार आहे.

 

🔹२८ रोजी श्री भागवत सप्ताह पारायण सांगता, महाप्रसाद होणार आहे. या पत्रकार परिषदेला मंडळाचे प्रसाद जोशी, प्रशांत शेवडे, यशवंत आपटे, प्रकाश नवाथे, अनुराधा आपटे, शरद आपटे, ऋषी नवाथे, विद्या आपटे, आरती शेवडे, नवांचे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 10 =