२१ ते २५ एप्रिल या कालावधीत होणार साजरा
सावंतवाडी
आरोंदा (गावेळवाडी) येथील श्री देवी कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर शिखर कलशस्थापना व पुर्नप्रतिष्ठापना उत्सव गुरुवार २१ एप्रिल ते सोमवार २५ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. गुरुवार २१ एप्रिल रोजी मंदिरात सकाळी ९:०० वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम ,रात्रौ ८:०० वाजता ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ , गावतळे यांचा भजनाचा कार्यक्रम, शुक्रवार २२ एप्रिल रोजी सकाळी ८:३० ते दुपारी २:३० वाजेवपर्यंत धार्मिक कार्यक्रम, नैवेद्य, आरती तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ह.भ. प. बुवा श्री अनिल आरोंदेकर यांचे सुश्राव्य कीर्तन, शनिवार २३ एप्रिल – सकाळी ८:३० ते दुपारी.२:३० पर्यंत धार्मिक कार्यक्रम, नैवद्य, आरती, तीर्थप्रसाद. सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ह.भ. प. श्री विष्णू बुवा कांदे यांचे सुश्राव्य कीर्तन. रात्रौ ९:३० वा. श्री.देवी माऊली डोंगरपाल दशावतारी नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग, रविवार २४ एप्रिल रोजी स. ८:३० ते दु. २:३० पर्यंत धार्मिक कार्यक्रम,दू.१२ वा.३३ मि.या शुभमुहूर्तावर राजगुरू श्री महंत राजेंद्र महाराज , तळवणे मठ यांच्या शुभ हस्ते शिखरकलश प्रतिष्ठा, नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद. सायं. काळोबा भजन मंडळ, मळेवाड जकातनाका यांचा स्वरनाद भजनाचा कार्यक्रम. रात्रौ.९:३० वा. दत्तमाऊली पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ,सिंधुदुर्ग यांचा नाट्यप्रयोग, सोमवार दि.२५ एप्रिल रोजी स.८:३० ते १०:५९ वा. धार्मिक कार्यक्रम, तीर्थप्रसाद, महाप्रसाद. सायं. ४ ते ६ वा. हळदीकुंकू समारंभ व फुगडी, त्यानंतर हरिपाठ शिरोडा रात्रौ ९ ते १० भजन, रात्रौ.१० वा. श्री. सिद्धेश्वर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ,दोडामार्ग यांचा शापमुक्त हा नाटयप्रयोग तसेच बुधवार दि.२० एप्रिल २०२२ रोजी वाजत गाजत श्री देवी सातेरी,भद्रकाली देवीची ओटी भरणे, कलश व उत्सवमूर्ती, गणपतीची मूर्ती आणणे आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे मंडळाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.