भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी विजवितरण कार्यकारी अभियंत्यांना दिला इशारा..
*कणकवली :*
तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु असलेल्या लोड शेडिंग विरोधात आक्रमक होत भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी विजवितरण च्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. कार्यकारी अभियंता मोहिते यांना लोड शेडिंगबाबत जाब विचारत परीक्षा सुरू असताना लोड शेडिंग कराल तर विजवितरणच्या गेटवरच ठिय्या देऊ, प्रसंगी विजवितरण च्या कार्यालयाला कुलूप ठोकू असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला. दळभद्री महाविकास आघाडी सरकार आल्यापासून लोड शेडिंग सुरू झाले आहे. फडणवीस सरकारच्या काळात राज्य लोडशेडिंग मुक्त होते. जिल्ह्यात आणि तालुक्यात सध्या शालेय परीक्षा सुरू आहेत. परीक्षा कालावधीत लोड शेडिंग करून शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असेही भाजपा पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले. कमी विजदाबामुळे चिरेखाण व्यावसायिकांच्या मोटर जळून लाखोंचे नुकसान झाले आहे.याबाबत रिले बदलला नाही तर जळालेलया सर्व मोटर आणून तुमच्या केबिनमध्ये टाकू असे उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांनी ठणकावले. ब्रेकर खराब असल्यामुळे लो व्होल्टेज ची अडचण असल्याचे कार्यकारी अभियंता मोहिते म्हणाले.
यावेळी भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, तालुका सरचिटणीस माजी उपसभापती महेश गुरव, पिसेकामते सरपंच सुहास राणे,बबलू सावंत, वागदे माजी सरपंच संदीप सावंत,समीर प्रभूगावकर, हनुमंत बोन्द्रे, प्रसाद देसाई सुशील सावंत, पप्पू पुजारे, विजय कदम, सदा चव्हाण, हरेश पाटील आदी उपस्थित होते.