You are currently viewing सावंतवाडी शहरात हनुमान जयंती उत्साहात संपन्न…

सावंतवाडी शहरात हनुमान जयंती उत्साहात संपन्न…

नरेंद्र डोंगरावरील प्रसिद्ध हनुमान मंदिरात भक्तांची गर्दी…

सावंतवाडी

शहरात विविध ठिकाणी हनुमान जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील नरेंद्र डोंगरावरील प्रसिद्ध हनुमान मंदिरात सुद्धा भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्या ठिकाणी कोरोना काळानंतर तब्बल तीन वर्षांनी भक्तांना तीर्थ प्रसादाचा लाभ घेता आला.

सावंतवाडी शहरात अनेक ठिकाणी हनुमान मंदिरे आहेत. या सर्व मंदिरात हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वच मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान येथील नरेंद्र डोंगरावर असलेले प्रसिद्ध हनुमान मंदिर कोरना नंतर आज पहिल्यांदाच भक्तांच्या गर्दीने फुलून निघाले. यावेळी त्या ठिकाणी भक्तांसाठी महाआरती व तीर्थप्रसाद ठेवण्यात आला होता. त्याचा लाभ उपस्थित भक्तांनी घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा