*ठाणे येथे पार पडलेल्या बार लीडर कॉन्फरन्स-2022 या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश श्री.अभय ओका यांच्या हस्ते प्रदान केले सन्मानपत्र*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील प्रथितयश विधीतज्ञ वकील श्री.विद्याधर चिंदरकर यांचा तीस वर्षाची वकिली कारकिर्द यशस्वी केल्याच्या सन्मानार्थ बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तसेच ठाणे जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे 14 एप्रिल 2022 रोजीआयोजित केलेल्या बार लीडर्स कॉन्फरन्स, ठाणे- 2022 या समारंभात सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय न्यायाधीश श्री.अभय ओका यांच्या हस्ते “सीनियर लॉयर सन्मानपत्र” देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, बार कौन्सिलचे चेअरमन श्री.मनन कुमार मिश्रा हे उपस्थित होते.
वकील श्री.विद्याधर चिंदरकर, कणकवली येथील ज्येष्ठ नामांकित वकील आहेत. कणकवली येथील नामांकित वकील श्री.प्रभाकर चिंदरकर यांचे सुपुत्र असलेले वकील विद्याधर चिंदरकर यांनी शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर येथून 1982 झाली बीएएलएलबी पदवी प्राप्त केली. आपल्या वकिली कारकिर्दीला सिव्हिल आणि क्रिमिनल केसेसच्या माध्यमातून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई येथील न्यायालयातून प्रॅक्टिस सुरू केली. वकील श्री.चिंदरकर यांना विशेष सरकारी वकील म्हणून अनेक खटल्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात नियुक्त केलेले होते. पोलिस कोठडी मध्ये मृत्यु झालेल्या एका प्रसिद्ध केसमध्ये पोलीस निरीक्षक सारीपुत्र यांच्यासह तिघांना झालेल्या शिक्षे कामी सिंधुदुर्ग न्यायालयाने विशेष सरकारी वकील म्हणून वकील श्री.विद्याधर चिंदरकर यांची नियुक्ती केली होती. वकील श्री.चिंदरकर हे स्टेट बँक ऑफ इंडिया, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक आधी बँकांच्या पॅनेलवर एडवोकेट म्हणून कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, न्यू इंडिया एशुरन्स कंपनी, फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी इत्यादी इन्शुरन्स कंपनीच्या पॅनेलवर देखील ते वकील म्हणून कार्यरत आहेत. वयाच्या 65 व्या वर्षीही वकिली व्यवसायात हुशार व प्रथित यश वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गुंतागुंतीच्या खटल्यांमध्ये त्यांनी यशस्वी काम केले आहे.
डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे, येथे पार पडलेल्या कार्यक्रमात फॉर्मर एडवोकेट जनरल ऑफ महाराष्ट्र श्री.डेरीयस खंबाटा, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया श्री.अनिल सिंग, एडवोकेट जनरल ऑफ महाराष्ट्र श्री.कुंभकोणी, एडवोकेट जनरल ऑफ गोवा श्री.देविदास पांगम, व्हाईस चेअरमन बार कौन्सिल ऑफ इंडिया श्री. एस प्रभाकरन यांची विशेष उपस्थिती होती. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच ठाणे जिल्हा कोर्ट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बार लीडर्स कॉन्फरन्स ठाणे -2022 याचे आयोजन वकील श्री.वसंत साळुंखे चेअरमन बी सी एम जी, वकील श्री.राजेंद्र उमाप व्हाईस चेअरमन बी सी एम जी, वकील जयंत जायभावे सदस्य बार कौन्सिल ऑफ इंडिया, वकील सुदीप पसबोला, वकील गजानन चव्हाण, कंवरनर अँड गार्डियन मेंबर, वकील प्रशांत कदम चीफ कॉर्डिनेटर, वकील राजन साळुंखे कॉर्डिनेटर, वकील हर्षल पाटील कॉर्डिनेटर, आदींनी केले होते. या कार्यक्रमासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष व सिंधुदुर्गातील प्रख्यात वकील संग्राम देसाई हे देखील उपस्थित होते.