भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती अध्यक्ष, संस्थापक अहमद मुंडे यांचा लेख
प्राचीन काळापासून मनुष्य प्राणी कुठल्या ना कुठल्या बंधनात . प्रेमात बांधला गेला आहे. आशेवरच जीवन कायमचं आहे. त्यांचे सर्वांचे नाते कोणत्या ना कोणत्या खानदानाशी रक्ताचे नाते जुळलेले असते. आजही आम्ही हे चांगल्या रीतीने जाणतो की. आपल्या कुटुंबात विविध कुळात. विविध खानदानात छोट्या छोट्या गोष्टींसाठी भा़डणे झाली आणि पूर्ण खानदानाचा नायनाट झाला दिवा लावण्यासाठी सुध्दा कोण बाकी राहिलं नाही. आजही दिवसेंदिवस मानसाचे जीवन धकाधकीचे आहे. अशा आकांक्षा वाढल्या आणि माणसाच्या मनात काम.मोह .माया. स्वार्थ. मत्सर. द्वेष. यांनी खोलवर जागा केली आहे. हे आजचे नाही बरेचं वर्षांपासून हे आपणं बघत आलो आहोत. महाभारत युद्ध. रामायण. हे आपल्याला शंभर वाईट लोक खानदान मध्ये असण्यापेक्षा पाच चांगली लोक भारत वर्ष घडवितात हे खरे आहे. आपल्या कुटुंबात झालेली छोटी चूक मोठ्यात मोठं संकट निर्माण करु शकते आणि सर्व कुटुंब खानदान बेचिराख होण्यास वेळ लागत नाही. याच गोष्टी यांचा विचार करून काही मत मांडत आहे . हे सर्व विचार आपल्या कुटुंबाला खानदानाल लाभदायक होतील अस मला वाटत.
कोणत काम चांगलं आहे कोणत वाईट आहे याचा आपणांस व आपल्या कुटुंबास काय फायदा तोटा होईल हा विचार आपल्या कुटुंबाला लाभ किंवा. संकटात घालू शकतो. मी लोकांचे चांगलें वाईट ओळखून तीच गोष्ट सा़गेन की समजावून घेऊन लोक आपले कुटुंब खानदान सहीत गुणवान होऊन जाईल आणि वाईट यांची त्यांना ओळख होऊन जाईल
ज्या घरात भा़डखोर पत्नी नितीचार न स़भाळणारी . तोडफोड करणारा नोकर हा आपले नुकसानच करणार. तिथे नेहमी वाद भांडणे व दुःखच असतें. आपला आणि आपल्या कुटुबाचा. खानदानाचा खरा सदस्य तोच असतो.जो वाईट वेळ आल्यावर आपले धैर्य न सोडता आपल्या लोकांना तन.मन. धन. आणि पूर्णपणे निस्वार्थी पणाने मदत करतो.
ज्याचा मुलगा मुलगी आज्ञाधारक असेल.असे कुटुंब स्वर्गापेक्षा सुंदर असतें. त्याला एक चांगलें आणि सुखी कुटुंब म्हणता येईल. अशा कुटुंबात नेहमी सुख शांती खरं प्रेम बघायला मिळते. आपल्या काही चूका आपला वेगळेपणा यामुळे आपणं कायम दुःखी कष्टी असतो. असे लोक आपले कुटुंब सोडून दुसर्याच्या कुटुंबात वास्तव्य करत असतील तर ते सर्वांना जास्त दुःख देणारे असतांत . बुध्दी असणार्या लोकांना आपल्या मुलांना कुटुंबाला अपत्यांना योग्य शिक्षण द्यावे. चांगल्या शिक्षणाने त्यांना जीवन जगण्यासाठी चांगलें मार्गदर्शन मिळेल त्यांचे जीवन सुखकर होईल. कारणं अपत्याच्या कार्यामुळे कुटुंबांचे खानदानाचे नाव प्रतिष्ठा वाढते. चांगली गुणवान अपत्ये बुद्धिमान अपत्ये खानदानाची कुटुंबाची प्रतिष्ठा माण वाढवत असतात.जे माता पिता आपल्या अपत्यांना शिक्षणापासून वंचित ठेवतात ते मुलांचं सर्वात मोठें शत्रू आहेत. अशी जी अपत्ये अशिक्षित असतात ती तरूण झाल्यावर त्याच्या ध्यानात येते की आपणं जगापेक्षा किती मागं आहोत याची जाणीव होते. त्यांच्या मनात हिन भावना निर्माण होते. या मुलांची अवस्था संस्थांच्या सानिध्यात राहणा-या कावळ्या प्रमाणे किंवा बगळया प्रमाणे होईल म्हणून प्रत्येक माता पिताने आपले परम कर्तव्य म्हणून आपल्या मुलांना जास्ती जास्त शिक्षण देणे गरजेचे आहे. ज्यामुळे मुल मुली तरुण झाल्यावर विशिष्ट ज्ञानाने योग्य होतील. मुलांचे मुलींचे फाजिल लाड केले तर त्यांच्यात अनेक दोष निर्माण होतात. म्हणून मुलगा मुलगी शिष्य याचं लाड न करता त्यांना कठोरपणे वागावावे. पण आज काळ बदलला आहे मुलगा मुलगी शिष्य पालकांना बोलू देत नाहीत. यांच्यावर ओरडणे मारणे ही कुटुंबाची खानदानाची सभ्यता आहे कां?
वडिल आणि गुरू यांच्यावर मोठी जबाबदारी असतें मुलांचे लहान मोठें दोष याकडे दुर्लक्ष न करता वेळीच शासन करायलाच हवे. कारणं आत्ताची कठोरता ही भविष्यात मुलांना मुलींना शिष्याला मधाची गोडी देणार असतें. मुल मुली शिष्य याचं पाणयासारख असतं ज्या भांड्यात घालता त्याप्रमाणे त्याला आकार येतो. हे तर आई वडील गुरू यांच्या वागणूकीवर अवलंबून आहे की ते काय शिक्षण देतात.
मोठ्या मोठ्या वनात एकच असं झाड असतं त्याच्या वासाने सर्व वन सुगंधित होतें त्याप्रमाणे प्रामाणिक आणि बुद्धीमान एकच मुलगा शंभर मूर्ख मुलांपेक्षा चांगला असतो. जंगलात एका ठिकाणी जर आग लागली तर पूर्ण जंगल बेचिराख होतं. त्याचप्रमाणे कुटुंबात खानदानात एक मुलगा मुलगी नितीभरषट वेडा असेल तर ते कुटुंब व पूर्ण खानदान बदनाम होते. यासाठी प्रामाणिक आणि बुध्दिमान मुलगा एकच असलातरी वंशासाठी कुटुंबासाठी खानदानासठी चांगला आहे.वाईट मुलगा मुलगी पेक्षा वंश नसलेला बरा कमीत कमी अशा मुलांमुळे सहन करावे लागणारे दुःख तरी होणार नाही
एकच मुलगा मुलगी विद्वान असेल व तो चांगलें कर्म करीत असेल तर तो मुलगा मुलगी पूर्ण खानदान कुटुंब नाव किर्तीमान करतो. असा सद्गुणी मुलगा असा असतो जो चंद्र एकच पण त्यामुळे पूर्ण जग प्रकाशित होते. माता पित्याना त्रास व दुःख देणारी मुले जास्त असतील तरी त्याचा काय उपयोग ? पण एकच असा मुलगा मुलगी असेल जो आई वडील यांची सेवा करील महतार पनी त्यांची काठी होईल तर तो सर्वात चांगला मुलाला पाच वर्षांपर्यंत प्रेम करावे. दहा वर्षांपर्यंत त्याला दाटावे.सोळा वर्षांचा झाला कि त्याला आपला मित्र समजावा म्हणजे आपण आणि एक अकरा व्हाल तोंच मुलगा आपल्या खांद्याला खांदा लावून चालेल
सुखशांती व लक्ष्मी त्याच घरात असतें. ज्या घरांत मूर्खाची पूजा होत नाही. ज्या घरात पती पत्नी यांच्यात भांडणे होत नाहीत. ज्या घरांत विद्वानांचा आदर होतो. गुणवान मुल कमी असली तरी चालतील. जास्त मूर्ख मुलं काय कामांची जसं आकाशात तारे अनेक असतांत पण उजेड तर चंद्र आणि सुर्य असतोच. मूर्ख मुलगा सेवा करील त्यापेक्षा मरण बरे. कारणं त्यांच्या मृत्यूचे फक्त दुःख काही दिवस राहिल नंतर ते संपेल पण तो जर जीवंत राहिला तर जन्माच दुःख. जी गाय दुध देत नाही ती काय कामांची? एकाच आईच्या उदरातून जन्मला येणारी सर्व मुलं एकसारखी नसतात त्याप्रमाणे बोरीच्या झाडावर बोरा सोबत काटे सुध्दा लागतात. पण दोघांचे मूळ एकच असते
जन्मदाता. यज्ञोपवित. संस्कार करणारा.शिक्षक . संरक्षक. अशी पाच व्यक्ति माणसांचे सर्वात मोठे मित्र असतात. कर्ज घेणारा बाप. चरित्रहीन आई. सुंदर पतीची स्त्री. मूर्ख संतती. हे माणसांचे सर्वात मोठें शत्रू आहेत.
मोठ्या घरात जन्माला आला म्हणून कोणी मोठा होत नाही. महान तोंच होतों. ज्याच्याजवळ गुण आहेत. विद्या आहे त्याला कधी लहान हीन समजू नका. ज्यांनी लहान कुटुंब खानदानात जन्म घेतला पण ते बुध्दिमान.शिक्षित आहेत ज्यांच्या जवळ विवेक आहे. असे लोक फक्त आपल्या गुणानेच महान होतात. मुलांनी मुलींनी शिष्य यांनी आठ गोष्टींपासून कोसो दूर राहावे. काम . क्रोध . लोभ. स्वादिष्ट पदार्थ. शृंगार. खेळ. जास्त झोप. अतिसेवा. या सर्व वस्तूंपासून दूर राहिलयानेच विद्यार्थी आपले जीवन सुखी करू शकतो .
सुखी आणि शांतीपूर्ण घर तेच आहे. ज्या घरांची संतती बुध्दिमान व सुशिक्षित आहे. स्त्री शांति प्रिय आहे पूर्ण रुपाने गृहिणी आहे . आपल्या घरचे काम सेवा थोरा़ची लहानाची सर्व कामे सवता करते. ज्या घरांत अतिथिचा सत्कार केला जातो. ज्या तहानलेल्या लोकांना पाणी. भुकेलेल्या लोकांना पोटभर अन्न मिळते. ज्या घरांत बुध्दिमान ज्ञानाचे संगीत आहे.
अनुकरण करून कोणी ज्ञानी होत नाही. त्यासाठी रकतताच ज्ञान असावे लागते
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९