You are currently viewing सामाजीक समता आणि सलोखा राखायचा असेल तर संविधानाचा आदर व रक्षण करण्याची गरज प्रा. डॉ. सोमनाथ कदम

सामाजीक समता आणि सलोखा राखायचा असेल तर संविधानाचा आदर व रक्षण करण्याची गरज प्रा. डॉ. सोमनाथ कदम

दोडामार्ग

संविदानाच्या माध्यमातून आपला भारत  देश चालतो, भारताच्या संविधानात हळूहळू बदल केले जात आहेत. सामाजीक समता आणि सलोखा राखायचा असेल तर संविधानाचा आदर व रक्षण करण्याची गरज आहे.बाबासाहेबांनी दिलेले संविधानिक विचार आपल्याला पुढे घेऊन जाणारे आहेत. तेव्हा लोकशाहीच समर्थन आणि जतन करण्याची गरज आहे.असे आवाहन प्रा.डॉ.सोमनाथ कदम यांनी केले. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोडामार्ग तालुकास्तरीय जयंती कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

क्रांतीसूर्य,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा तालुकास्तरीय १३१ वा जयंती कार्यक्रम गुरुवारी दोडामार्ग येथील महाराजा हॉल मध्ये मोठया उत्साहात भव्यदिव्य असा साजरा झाला तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित झाले होते. आर.पी.आय.(आठवले), सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ (मुंबई ), भारतीय बौध्द महासभा,वंचित बहुजन आघाडी,भारतीय बौध्द महासभा ( रजि. नं. ३२२७ ) आणि युवा परिवर्तन संघर्ष संस्था या सर्व तालुका शाखा दोडामार्ग यांच्या संयुक्त विदयमाने आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणूम दोडामार्ग चे नायब तहसीलदार व्ही एस गवस कसई दोडामार्ग चे नगराध्यक्ष चेतन चव्हाण प्रमुक वक्ते म्हणून प्रा.डॉ.सोमनाथ कदम ( लेखक व संशोधक इतिहास विभाग प्रमुख कणकवली कॉलेज), कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाकांत जाधव (आर. पी. आय. (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव) दोडामार्ग पोलीस निरीक्षक भोसले, स्वागताध्यक्ष शंकर झिलू जाधव (अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बाध्द हितवर्धक महासंघ मुंबई शाखा दोडामार्ग ) शंकर मधुकर जाधव ( जिल्हा प्रसिद्धी प्रमुख वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग) सखाराम कदम (कार्याध्यक्ष आर.पी.आय.(आठवले) सिंधुदुर्ग जिल्हा), प्रकाश कांबळे, (अध्यक्ष आर.पी.आय.(आठवले ) शाखा दोडामार्ग) अर्जुन कदम (अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा शाखा दोडामार्ग) बाळकृष्ण कदम (माजी अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी दोडामार्ग ),सुरेश बांदेकर (अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी दोडामार्ग), केशव आयनोडकर (अध्यक्ष युवा परिवर्तन संघर्ष संस्था दोडामार्ग), गोपाळ जाधव ( जिल्हाउपाध्यक्ष आर.पी.आय.(आठवले) युवक आघाडी सिंधुदुर्ग ), समाजकल्याण सभापती अंकुश जाधव ज्योती रमाकांत जाधव (महिला बालकल्याण सभापती नगरपंचायत कसई दोडामार्ग) क्राती महादेव जाधव (महिला बालकल्याण उपसभापती नगरपंचायत कसई दोडामार्ग) तसेच अर्जुन आयनोडकर, श्रीधर जाधव, लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, दीपक जाधव, शंकर जाधव, दिपज्योति जाधव उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. सोमनाथ कदम पुढे म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार हे पुढे घेऊन जाणे आणि आत्मसात करणे आज गरजेचे आहे. अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञाकडे आणि अधर्मातून धर्माकडे घेऊन जाणार असं बाबासाहेबांच व्यक्तीमत्व आहे. वेगवेगळे गटतट बाजूला ठेवून सर्वानी एकत्र आलो पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. आंबेडकरी विचारांवर आणि विज्ञानावर जगणारा बहुजन समाज आहे. युवा पिढीने शिक्षणासाठी गाव सोडण्याची गरज आहे. तरच आपण शैक्षणिक प्रगती करू शकतो.पालक हे जन्माचे नव्हे तर कर्माचे साक्षकीदार आहेत. शिक्षणाकडे गांभिर्याने लक्ष दया.समाजासाठी आपल्याला जगायचं आहे. यासाठी सर्वानी मदतीचा हात दिला पाहिजे.ज्या पद्धतीने स्त्री आणि पुरुष एकत्र येत आपलं घर संसार सांभाळतात तसेच समाज हे आपलं घर आहे. हे समजून आपण सर्वांनी पुढे येऊन तशा प्रकारे आपला समाज सांबाळायच आहे. आपल्यात विचारांची आणि बौद्धिक क्षमता वाढविणार तेव्हाच बाबासाहेबांच स्वप्न साकारु शकतो. आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता हा आचार विचार आणि कृती ने पुढे असला पाहिजे. बाह्य परिवर्तनापेक्षा मानसिक परिवर्तन गरजेचं आहे. गुलामगिरीत जगू नका सामाजिक धार्मिक आणि राजकीय विषतेला बदलण्याचं काम, ही सामाजिक क्राति बाबासाहेबांनी घडविली आहे.एक माणूस सुधारला म्हणजे समाज सुधारला असं नाही. वैयक्तिक प्रगती महत्वाची तेवढीच सामूहिक प्रगतीही महत्वाची आहे. सामाजिक बांधिलकी आणि बाबासाहेबांना मानणाऱ्याना मदत करा. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे कार्यकर्त्यांची ताकद आहे. आंबेडकरी चळवळ ही एका रक्ताची, एका गटाची मक्तेदारी नाही आहे. ही चळवळ बहुजन समाजाची आहे. भारताच्या संविधानात हळूहळू बदल केले जात आहेत. सामाजीक समता, सलोखा राखायच असेल तर संविधानाचा आदर व रक्षण करण्याची गरज आहे. संविदानाच्या माध्यमातून आपला देश चालतो
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक विचार आपल्याला पुढे घेऊन जाणारे आहेत. लोकशाहीच समर्थन, जतन करणे गरजेचे आहे. लोकशाही जगली पाहिजे ती उध्वस्त झाली तर बहुजन समाजाला काहीही मिळणार नाही. बाबासाहेबांची व्यक्ती म्हणून पूजन न करता त्यांच्या विचारांच पूजन करा.भावनिक चळवळ घेऊन जाण्याची वेळ नाही तर विचारांची चळवळ पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी खूप घाव सोसले म्हणून ही चळवळ उभी झाली. अधिक संघटित होऊन चळवळीची शस्रे अधिक तेज करण्याची गरज आहे.असे प्रा. डॉ. सोमनाथ कदम म्हणाले.

यावेळी विचारामांचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार मांडून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत दोडामार्ग तालुक्यात अशा विविध संघटना एकत्र येत बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याबद्दल आयोजकांचे सर्वांनी कौतुक केले.

*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचारामांचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  दोडामार्ग तालुक्यातील मागासवर्गीय समाजातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तर या समाजातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर याची पुस्तक व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.*

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेमेंच पूजन करून आणि मेणबत्ती पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात यावेळी हेवाळे येथील महिला भीमग्रुपने स्वागतगीत सादर केले.उपस्थित मान्यवरांचे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शंकर झिलु जाधव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  बुध्दभुषण बि.हेवाळकर (उपाध्यक्ष संस्कार भारतीय बौध्द महासभा शाखा दोडामार्ग ), प्रास्ताविक संदिप जाधव ( सहसचिव युवा परिवर्तन संघर्ष संस्था दोडामार्ग ) तर आभार अर्जुन आयनोडकर ( खजिनदार सिंधुदुर्ग जिल्हा बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई शाखा दोडामार्ग ) यांनी मानले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात तालुक्यातील हेवाळे, मणेरी, साटेली आणि घोटगे येथील महिलांनी भिमागीतं सादर केली. शिरंगे येथिल महिलांनी भिमागीतावर नृत्य सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा