सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा संपन्न
सिंधुदुर्गनगरी
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सामाजिक समता कार्यक्रम अंतर्गत आज शुक्रवार दि. १५ एप्रिल २०२२ रोजी महिला मेळावा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रमूख पाहूणे प्रमोद जाधव, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग, माया रहाटे प्राध्यापक समाजकार्य विभाग उपपरिसर सिंधदुर्ग मुंबई विद्यापीठ आणि ॲड सुवर्णा हरमळकर सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यास माया रहाटे, ॲड सुवर्णा हरमळकर व प्रमोद जाधव यांनी उपस्थितांना महिलांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत मार्गदर्शन केले. यावेळी महिला मेळाव्यास सिंधुविकास शेड्युल कास्ट औद्योगिक संस्थेतील कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध योजनांचे मार्गदर्शन केले. या निमित्ताने अधिनस्त असलेल्या मुलींचे शासकीय वसतीगृह,वेंगुर्ला येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास सामाजिक न्याय विभागातील अधिकारी- कर्मचारी, व सर्व महामंडळे आणि जिल्हा जात पडताळणी कार्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहातील गृहपाल / कर्मचारी व महिला कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.