You are currently viewing सुकळवाड ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

सुकळवाड ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

३३ लाख रु. निधीतून भव्य दिव्य इमारतीची उभारणी

ग्रा. पं. सभामंडपासाठी निधी देण्याची खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांची ग्वाही

सुकळवाड ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन आज सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन जनसुविधा, जी.प., पं.स., ग्रा. प. १५ वा वित्त आयोग, जिल्हा परिषद सदस्य स्वनिधी असा एकूण ३३ लाख रु च्या निधीतून ग्रामपंचायतची भव्य दिव्य इमारत उभारण्यात आली आहे. यावेळी दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने उपस्थित मान्यवर व माजी सरपंच, आरोग्य कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील कमर्चारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तंटामुक्ती अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

सुकळवाड मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून सुमारे अडीच कोटीची कामे झाली असल्याची माहिती खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी यावेळी दिली.तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चिपी विमानतळ,मुंबई गोवा महामार्ग असे मोठे प्रकल्प जिल्ह्यात मार्गी लागले आहेत. येत्या काळातही जास्तीत जास्त निधी या भागासाठी दिला जाईल. निधीची कमतरता भासणार नाही. ग्रामपंचायतच्या सभामंडपासाठी देखील निधी दिला जाईल अशी ग्वाही खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जि. प.सदस्य माधुरी बांदेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, माजी सभापती अजिक्य पाताडे, सरपंच वैभवी मोरजकर, उपसरपंच स्वप्नील गावडे, प्रसाद मोरजकर, ग्रामसेवक महेंद्र मगम,बाळ महाभोज, समीर वायंगणकर, राजाराम गावडे, नरेंद्र पाताडे, प्रकाश पावसकर, यशवंत भोजने, सुभाष टेंबुलकर, सागर कुशे, विलास बिलये, विलास मसुरकर, बाबूराव मसुरकर, संतोष जामसंडेकर, वृषाली गरुड, नूतन बांदेकर, लक्ष्मी पाताडे, जयश्री मयेकर, दीपिका गावडे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा