भंडारी समाज जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांचे आवाहन
सावंतवाडी
येथील तालुका भंडारी मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात अनेक वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात याची प्रेरणा घेऊन सर्व तालुके आता सक्रिय झाले आहेत.मात्र कार्यक्रमात तरुण मंडळींचा सहभाग हवा तसा दिसून येत नाही याची थोडी खंत आहे. तरुण मंडळींनी आपल्याच ह्या मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी होत या मंडळाची धुरा पुढे चालवावी असे आवाहन यावेळी आपल्या भाषणातुन जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी केले.
वधूवर सूचक मंडळांचे अवाजवी शुल्क, टीव्ही इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्यक्ष वधू किंवा वराला न पाहता जोडीदाराची निवड ज्यांची ओळख ना पाळख अशा व्यक्तीशी संसार मांडणे अशा गोष्टींनी त्रस्त वधु-वरांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येथील तालुका भंडारी मंडळाच्या वतीने येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या नवरंग कलामंच हॉल येथे आयोजित करण्यात आलेला भव्य वधू – वर आज उत्साहात पार पडला जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी रमण वायंगणकर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी भंडारी महासंघ जिल्हा सचिव विकास वैद्य, सदस्य जयप्रकाश चमणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, उपाध्यक्ष प्रसाद आरविंदेकर, गुरुनाथ पेडणेकर, बाळा आकेरकर, सचिव दिलीप पेडणेकर, कुडाळ तालुका अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, सदस्य सतीश नाईक, महिलाध्यक्षा शीतल नाईक, समता सुर्याजी, वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष अॅड. शाम गोडकर, हनुमंत पेडणेकर, निलेश कुडव, दीपक जोशी, नामदेव साटेलकर, रवि तळाशिलकर, राजू आचरेकर, पंकज पेडणेकर, बाबु मुणगेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, शरद पावसकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, राजाराम गवंडे, सुनिल नाईक, गौरवी पेडणेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाभरातून इच्छुक वर वधूंनी आपली नोंदणी केली या मेळाव्याचे वैशिष्टय म्हणजे डिजीटल पद्धतीने या वेळी वधूवरांची ओळख डिस्प्लेवर करण्यात आले वधू वर व त्यांचे पालक व सहकारी तसेच भंडारी जातीबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.