कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे अलीकडेच पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली होती. त्यावेळी जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त करून बंद पाडण्यास भाग पाडले होता. कुडाळ येथील पोलिसांनी केलेल्या कारवाईला सामोरे जात वटपोर्णिमेतील सावित्रीचा सत्यवचनी नवरा व हरमल गावाच्या नावाने आडनाव धारण करणारा करणाऱ्या जुगाराच्या बादशहा उद्यापासून पिंगळी येथील अंदर बाहर जुगाराचा सोशल क्लब सुरु करणार आहे. या सत्यवचनी जुगाऱ्याने कुडाळ पोलिसांच्या नाकावर टिच्चून विनासायास पुन्हा एकदा जुगाराच्या सोशल क्लब चा शुभारंभ करण्याचे मनसुबे आखले आहेत.
या सावित्रीच्या नवऱ्याची जुगाराची बैठक विनासायास सुरू करण्याची संपूर्ण तयारी झाली असून जुगाराच्या खेळाडूंना देखील निमंत्रण पोचविले आहे. त्याचप्रमाणे जुगाराची तक्षिम घेण्यासाठी सुद्धा मोठमोठ्या जुगाऱ्याना ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे उद्यापासून पिंगुळी येथे पुन्हा एकदा सोशल क्लबच्या माध्यमातून अंदर बाहर जुगाराची मैफिल रंगणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरात, गावागावात जुगाराच्या बैठका जोरदार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सावंतवाडी येथे गरड विभागात कालच सावंतवाडी पोलीस निरीक्षकांनी धाड टाकून चौघा संशयितांवर कारवाई केली होती. यामुळे शहर परिसर देखील जुगाराच्या बाबतीत मागे राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या गैर धंदे यांची योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.