You are currently viewing श्री लाॅर्ड बालाजी निधी बॅंकेचा उद्घाटन सोहळा थाटामाटात

श्री लाॅर्ड बालाजी निधी बॅंकेचा उद्घाटन सोहळा थाटामाटात

संभाजीराव भिडे गुरुजी , गजानन महाजन गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती

इचलकरंजी येथे श्री लाॅर्ड बालाजी वेंचर निधी बॅंकेचा उद्घाटन सोहळा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते थाटामाटात
करण्यात आला.यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष गजानन महाजन गुरुजी ,माजी नगराध्यक्षा सौ.शुभांगी बिरंजे ,माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार , माणुसकी फौंडेशनचे रवी जावळे ,मलकारी लवटे ,श्री लाॅर्ड बालाजी वेंचर निधी बॅंकेचे प्रमुख दत्तात्रय जाधव ,सौ.शितल जाधव
यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वसामान्य वर्गातील घटकांना लघु उद्योग सुरु करण्याबरोबरच दैनंदिन जीवनातील विविध समस्या सोडविण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळण्याची नितांत गरज असते.हीच जाणीव ठेवून इचलकरंजी येथे दत्तात्रय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून श्री लाॅर्ड बालाजी वेंचर निधी बॅंकेची स्थापना केली आहे.या बॅंकेचा उद्घाटन सोहळा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते थाटामाटात
करण्यात आला.
यावेळी संभाजीराव भिडे गुरुजी यांनी श्री लाॅर्ड बालाजी वेंचर निधी बॅंकेच्या माध्यमातून लघु उद्योजकांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांच्या उद्योग विस्ताराबरोबरच विकासासाठी निश्चित उपयोग होवून देशाच्या विकासात मोठे योगदान राहणार असल्याचे गौरवोद्गार काढले.तसेच ही बॅंक सर्वसामान्य जनतेचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मोठा आधारवड ठरेल , असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विविध मान्यवरांनी देखील श्री लाॅर्ड बालाजी वेंचर निधी बॅंकेचा लघु उद्योजकांना चांगला उपयोग होवून तो देशाच्या विकासात मोठे योगदान देणारा ठरेल ,असा विश्वास व्यक्त केला.
प्रारंभी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांनी
मंञ पठन करुन तसेच फित सोडून
श्री लाॅर्ड बालाजी वेंचर निधी बॅंकेचे उद्घाटन केले.
यावेळी कोष्टी समाजाचे अध्यक्ष अमित खानाज , धारकरी अमित चव्हाण , राहुल बाणकर , दिनानाथ होगाडे , अमोल होगाडे ,शंतनू पोवार ,जयेश बुगड , रवीशंकर चिटणीस , योगेश अवघडे , सर्जेराव साळुंखे , रमेश शिंदे ,
बाळासाहेब मेथे , संचालक आनंद गोलंगडे , नामदेव जाधव ,सौ.शितल जाधव ,सौ.पूनम जाधव ,सौ.संपदा जाधव ,तज्ञ संचालक प्रविण म्हैशाळकर ,विक्रम साळुंखे , कृष्णात पोवार ,स्वाती अग्रवाल ,निर्मल बागरी ,उमेश कानडे , आशुतोष मांडवकर , सोमनाथ बन्ने यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ओंकार सुतार ,संतोष पोवार ,अश्विनी लवटे , योगेश साळी ,सोनाली लगारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा