You are currently viewing सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ आयोजित “वधू वर मेळावा” उद्या दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी सावंतवाडीत

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ आयोजित “वधू वर मेळावा” उद्या दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी सावंतवाडीत

राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या “नवरंग कलामंच” येथे आयोजित

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ हे उपक्रमशील मंडळ असून मंडळातर्फे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम, मेळावे आयोजित केले जातात. मध्यंतरी कोरोनाच्या संकटामुळे जवळपास दोन वर्षे वधु वर मेळावा होऊ शकलेला नाही. सावंतवाडी भंडारी मंडळाने आपल्या समाजातील वधू वर यांचे विवाह जुळण्यासाठी पुढाकार घेतलेला असून दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी सावंतवाडीच्या आरपीडी हायस्कूलच्या नवरंग कला मंच हॉल मध्ये वधु वर मेळावा 2022 आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी हाक सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने दिली आहे.
*‘विवाह’ म्हणजे दोन जीवांचे मनोमिलन….’विवाह’ 2 कुटुंबाचे स्नेहबंधन…. ‘विवाह’ नवीन सहजीवनाचा शुभारंभ…..’विवाह’ आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण…..*
आपल्या आयुष्यातील अशा महत्त्वाच्या क्षणांची भेट घडवून आणण्यासाठी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ प्रयत्नशील असून मंडळातर्फे “वधु वर मेळावा 2022” आयोजित केलेला आहे. शहरात अवाजवी फी घेऊन स्वतःची तुंबडी भरणारी अनेक वधू वर सूचक मंडळे कार्यरत आहेत. त्याच बरोबर आता इंटरनेट आणि टीव्ही वाहिन्यांवरून ही लग्न जुळवली जात आहेत. मात्र प्रत्यक्ष वधू किंवा वराला न बघता टीव्ही इंटरनेट आदींच्या मोहजालात फसून आयुष्याचा जोडीदार निवडणे कितपत योग्य आहे? याची “ना ओळख ना पाळख” अशा व्यक्तीशी संसार मांडणे म्हणजे “आयुष्याचा खेळ” आणि म्हणूनच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ अत्यंत कमी फी घेऊन वधू वर मेळावा आयोजित करीत आहे.
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या मेळाव्याची वैशिष्ट्ये म्हणजे *एकाच छताखाली वधु-वरांना प्रत्यक्ष पाहण्याची व परिचय करून घेण्याची संधी. *माफक फी. *नाव नोंदणी पश्चात विवाह जुळे पर्यंत वधु-वर निवडण्यासाठी कायमस्वरूपी नोंदणी रजिस्टर मंडळाच्या कार्यालयात उपलब्ध. *मेळाव्यात कार्यक्रम स्थळी वधू-वरांच्या पालकांना बोलणी करण्याची संधी उपलब्ध असते. *वधू-वराला स्टेजवर परिचय करून देण्याची मुभा आहे. *मेळाव्यात सर्वांसाठी चहा-नाष्टा व अल्पोपहाराची व्यवस्था आहे.
सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने आयोजित केलेल्या वधू-वर मेळाव्यासाठी, वधू-वराचा शोध घेण्यासाठी आणि विवाह जुळवून आणण्यासाठी गरजवंतांनी प्रत्यक्ष नोंदणी करावी असे आवाहन केले आहे. या मेळाव्यासाठी नाव नोंदणी फी रुपये 500/- प्रत्येकी ठेवण्यात आलेली आहे. त्याच बरोबर नोंदणी करण्यासाठी वधू-वर पूर्ण फोटो, जन्म कुंडली आवश्यक आहे. नोंदणी ठिकाणी मेळाव्यासाठी वधू-वरांच्या सोबत दोन पालकांना प्रवेश देण्यात येईल.
*सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ आयोजित मेळावा राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या नवरंग कलामंच हॉलमध्ये शुक्रवार दिनांक 15 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे.*

संपर्कासाठी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ कार्यालय (02363)274771 त्याच बरोबर श्री.नामदेव साटेलकर 9420204190 / श्री.सिद्धार्थ पराडकर 9422967249 / श्री.ज्ञानदीप राऊळ 7517961796 / श्री.दिलीप पेडणेकर 9423324083
यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे सचिव दिलीप मंगेश पेडणेकर,अध्यक्ष जगदीश सहदेव मांजरेकर आणि सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा