You are currently viewing नवीन वर्षाची नव्याने सुरुवात – बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल मधील शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

नवीन वर्षाची नव्याने सुरुवात – बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल मधील शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

कुडाळ :

 

लॉकडाऊन च्या काळात आलेली मरगळ झटकून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल ची मुले नव्या उमेदीने आणि नव्या उत्साहाने शाळेच्या पहिल्या दिवशी हजर आणि शिक्षकांनी केले त्यांचे नाविन्यपूर्ण पद्धतीने केले स्वागत.

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये दि. ६ एप्रिल पासून नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या आनंदाने झाली. मुलांचे स्वागत आकर्षक व नाविन्यपूर्ण पुस्तक कमानीतून झाले. त्यानंतर त्यांनी मागील इयत्तेत केलेल्या विविध विषयातील सादर केलेले प्रकल्प यांची आकर्षक पुनर्मांडणी तसेच कु. पियुषा प्रभूतेंडोलकर यांनी घेतलेले विविध हास्यपर मनोरंजनात्मक खेळ यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निराशा टाकून मुले उत्साही होण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांचे आंधळी कोशिंबीर, रस्सीखेच खेळ, गमतीदार नटखक मैदानी खेळ ई.नी शालेय परिसर रंगलेला होता. मुले उत्साहाने त्यात सहभागी झाली होती. तसेच विविध विषयावर आधारित गणितीय खेळ खेळले गेले. मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद कानडे, योगेश येरम व अध्यापक यांच्या सहकार्याने सेंट्रल स्कूल मध्ये पहिला दिवस उत्साहात साजरा झाला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा