You are currently viewing लोरे जिल्हा परिषद मतदार संघातील कमळ चषकाचा मानकरी ठरला रासाई देवी स्पोर्ट आचिर्णे तर उपविजेता ठरला गांगोचाळा लोरे

लोरे जिल्हा परिषद मतदार संघातील कमळ चषकाचा मानकरी ठरला रासाई देवी स्पोर्ट आचिर्णे तर उपविजेता ठरला गांगोचाळा लोरे

तिसरा क्रमांकाचं पारितोषिक सीनियर सिटीजन भगवती सांगुळवाडी यांनी पटकावले

जिल्हाध्यक्ष नवलराज काळे भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण

वैभववाडी

कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय मंत्री भारत सरकार यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय नितेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या लोरे जिल्हा परिषद कमळ चषक 2022 भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मोठ्या दिमाखात सांगूळवाडी येथे पार पडला.या कमळ चषकाचा मानकरी स्पर्धेचा विजेता संघ रसाई देवी स्पोर्ट आचिर्णे तर उपविजेता ठरला गांगोचाळा लोरे ठरला असून तिसरा क्रमांकाचं पारितोषिक सीनियर सिटीजन भगवती सांगुळवाडी यांनी पटकावले आहे. हे बक्षीस वितरण सोहळा जिल्हाध्यक्ष भटके-विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग श्री नवलराज विजयसिंह काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलत असताना काळे म्हणाले आमदार नितेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मतदार संघातील युवक एकत्र आले एक सांघिक खेळ खेळाडू वृत्ती दाखवून सर्व सामने खेळले आमदार नितेश राणे साहेब हे दूरदृष्टी ठेवून काम करणारे नेतृत्व आहे त्यांच्या या संकल्पनेतून तळागळातील गावोगावी असणाऱ्या युवकांमधून नवीन क्रिकेटपटू/खेळाडू तयार होऊन क्रीडा क्षेत्रामध्ये त्याला प्रकाशझोतात आणण्याकरिता सर्व परीने प्रयत्न करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आहेत. येणाऱ्या काळात युवकांसाठी ज्या काही योजना असतील ते या मतदारसंघांमध्ये राबवण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध आहोत आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वांनी त्यांचे हात बळकट करावे असे प्रतिपादन नवलराज काळे यांनी केले. यावेळी व्यासपीठावरती सांगुळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तथा भाजपा बूथ अध्यक्ष विश्वासराव पाटील, महेश पाटील, सुभाष लोके (लोरे), वैभव रावराणे (लोरे), शेखर सुतार (लोरे), राजेंद्र रावराणे (लोरे) संग्राम रावराणे (अचिर्णे), सचिन सुतार नावळे, उदय पाटील कल्पेश रावराणे अक्षय पाटील आदी उपस्थित होते. या स्पर्धेचा मालिकावीर – गांगोचाळा लोरे संघाचे अभय पांचाळ, उत्कृष्ट फलंदाज रासाईदेवी स्पोर्ट अचिर्णे संघाचे शुभम सावंत, उत्कृष्ट गोलंदाज भगवती सांगुळवाडी संघाचे अक्षय पाटील, यांना भारतीय जनता पार्टीचे श्री नवलराज काळे यांच्या सौजन्याने आकर्षक चषक देण्यात आले. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण भगवती सांगुळवाडी संघाचे रितेश घाडी यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रथम पारितोषिक 11111 भव्य कमळ चषक व सर्व खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले, द्वितीय पारितोषिक 7777 , भव्य कमळ चषक व सर्व खेळाडूंना मिळेल देऊन सन्मानित करण्यात आले. तृतीय पारितोषिक 5555 व आकर्षक चषक देण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम रावराणे यांनी केले तर आभार अक्षय पाटील यांनी मानले. खेळीमेळीच्या वातावरणात 12 13 एप्रिल 2023 च्या रात्री हे सामने खेळविण्यात आले या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनामुळे युवकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली असून नक्कीच हे युवक येणाऱ्या काळात आपल्या खेळातून वैभववाडी तालुक्याचे नाव रोशन करतील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा