संत तुकाराम महाराज सांगतात —
*न घडो कोणाही भुताचा मत्सर | वर्म सर्वेश्वर पूजनाचे ||*
” कोणाचाही मत्सर-द्वेष करायचा नाही व दुसर्याचे दुःख, नुकसान किंवा फसवणूक करायची नाही “, एवढेच व्रत जरी सर्व धर्मातील प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणे स्वीकारले, तरी सुद्धा अखिल मानव जातीला सुख, शांती व समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय असे करणे हे सर्वार्थाने सर्वांच्याच हिताचे असते. याचे प्रमुख कारण असे की, ज्या प्रमाणे समोर भिंतीवर फेकलेला चेंडू मारणाऱ्याकडे परत येतो, त्याचप्रमाणे दुसऱ्यांना दुःख दिले तर ते दुःख दुसऱ्यांना बाधा करून बुमरॅंग होऊन दुःख देणाऱ्याच्याच मानगुटीवर येऊन बसते आणि म्हणून जीवनविद्या सांगते –
*” दुसऱ्यांना सुखी करता आले नाही तरी चालेल पण निदान त्यांचे दुःख तरी निर्माण करू नका, दुसऱ्यांची स्तुती करण्याची इच्छा नसेल तर निदान त्यांची निंदा तरी करू नका, दुसऱ्याच्या पायावर डोके ठेवण्याची इच्छा नसेल तर निदान त्यांच्या डोक्यावर पाय तरी ठेवू नका, दुसऱ्यांच्या मुखात अन्नाचा घालता येत नसेल तर निदान त्यांच्या मुखातील घास तरी काढून घेऊ नका.”* ( क्रमशः. )
*– सद्गुरू श्री वामनराव पै.*