शिरोडा येथील सेंट्रल प्रायमरी स्कूल येथे सरपंच मनोज उगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक बक्षिस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ उपस्थित होते.
गेली दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्यामुळे सेंट्रल प्रायमरी स्कूल शिरोडा नं १ या शाळेचा बक्षिस वितरण सोहळा होऊ शकला नव्हता. यंदा कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यानंतर शाळा व्यवस्थापक समिती सभेमध्ये वार्षिक बक्षिस वितरण सोहळा घेण्याचे ठरविण्यात आले.त्याप्रमाणे शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला.
या बक्षिस वितरण समारंभ सोहळया निमित्त सागरतीर्थ येथील हाॅटेल व्यवसायिक असलेले उदयोजक व शिक्षण प्रेमी राजेंद्र देवू नाईक यांनी या शाळेला भरीव देणगी दिली. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी श्रीम.वंदना परब (शि.वि.अधिकारी वेंगुर्ला) व श्रीम.प्रियदर्शनी कावळे (केंद्रप्रमुख शिरोडा) यांनी आपले मनोगत व्यक्त करुन कायम बक्षिस ठेव म्हणून भरीव देणगी दिली.
त्यानंतर माजी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शाळेसाठी साऊड सिस्टम खरेदी करण्यासाठी धनादेश या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा तिवरेकर यांच्याकडे सुपूर्द केला. आपल्या मनोगतामध्ये आपल्या कडून शाळेला जिल्हा परिषदेकडून दिलेल्या विविध स्तरावरच्या निधीची आठवण करत आपल्या परिचीत दानशूर व्यक्तीकडून शाळेला कशी मदत होईल यासाठी आपल्याकडून प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.त्याच प्रमाणे या शाळेच्या शा.व्य.समिती अध्यक्ष श्रीमती हर्षा परब व शा. व्य.समिती माजी अध्यक्ष व विदयमान सदस्य लक्ष्मीकांत कर्पे ,शालेय व्यवस्थापन समितीतील शिक्षण तज्ज्ञ म्हणून नियुक्त असलेले डाॅ. श्रीराम दिक्षित यांनी आपले बहुमोल विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले व मनोगतातून विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या .
या बक्षिस वितरण समारंभाचे अध्यक्ष सरपंच मनोज उगवेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शाळेला पंधराव्या वित्त आयोग निधीतून शाळेच्या व्हरांड्याला ग्रिल लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी शिरोडा ग्रामपंचायत उपसरपंच राहुल गावडे, ग्राम पंचायत सदस्य कौशिक परब,श्रीमती समृध्दी धानजी तसेच शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कांता तारी, सदस्य, नामदेव गावडे, फ्रान्सिस फर्नाडिस,श्रीमती शर्वरी कांबळी,श्रीमतीअस्मिता सावंत , माता-पालक संघ उपाध्यक्ष श्रीम.स्वरांगी उगवेकर, माता – पालक संघ सदस्य श्रीमती राजश्री शिरोडकर, श्रीमती स्निती शिरोडकर तसेच शिक्षक पालक संघ सदस्य श्रीमती श्रेयसी कदम, श्रीमती संतान फर्नांडिस ,शाळा व्यवस्थापन माजी उपाध्यक्ष संदीप मस्के व चंद्रशेखर तारी- ग्रामस्थ आरवली उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते गेल्या दोन वर्षातील वार्षिक बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला.
प्रास्ताविक या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा तिवरेकर, शाळेचे वार्षिक अहवाल वाचन सौ.सविता परब , बक्षिस वितरण हणमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.या सूत्रसंचालन प्रेमदास राठोड यांनी केले.