बांदा
येथील आराध्य व जागृत असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिराच्या कलश रोहणाचा “सहावा वर्धापन दिन” सोहळा बुधवार दिनांक २७ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७ वाजता गणपती पुजन, देवतास नारळ, विडे अर्पण करुन समुहदायी गाऱ्हाणे, सकाळी ८:३० ते १:०० पर्यंत श्री देव बांदेश्वर मंदिरात लघुरुद्र अनुष्ठान, देवी भुमिका मंदिरात श्री सुक्त आवृत्ती जप अनुष्ठान, श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशिर्ष आवृत्ती जप अनुष्ठान, दुपारी आरती व महाप्रसाद सायं. ४ ते ७ पर्यंत भजन कार्यक्रम, रात्रौ ९ वाजता पालखी सोहळा होणार आहे. धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या भक्तगणांना किंवा संस्थाना महाप्रसादासाठी वस्तुरूप देणगी द्यायची आहे , त्यांनी दि. २५ एप्रिल पर्यंत देवस्थान कार्यालयात आपली देणगी जमा करावी असे आवाहन श्री देव बांदेश्वर भुमिका देवस्थान यांच्या वतीने करण्यात आले आहे.