जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची अप्रतिम काव्यरचना
जल चंचल चंचल
बाष्प होई उन्हासवे
थंड गारवा लागता
वीज खेळे ढगासवे
वारा खेळतो कबड्डी
थेंब शिपिंत अंगणी
मातीसवे मिसळता
गंध सुहास चंदनी
धारा कोसळे पहाडी
जल होई शुभ्र दूध
थेंब तुषार फुलात
मोती सुगंधित ऊद
थेंब नाचे छतावर
तडतड बाजा वाजे
धार पन्हाळ कोसळे
पिका मिळे पाणी ताजे
ओढा ओहळ पाझर
खळखळ पाणी पळे
नाला वगळ त्या नदी
सोने पिकविते मळे
तळे विहीर धरण
वीज होत पाणी पळे
स्पर्श बाबासाहेबांच्या
चवदार होई तळे
सात समुद्री त्रिभुज
हिम हिमालय बर्फ
लाट चंचल चंचला
जलसृष्ठी मीठ अर्क
©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.