सैनिक पतसंस्था आणि इंडियन एक्स सर्व्हिसेस लिगचे आयोजन…
सावंतवाडी
भारतील सैन्य दलालमध्ये दाखल होवून देशसेवेचे पवित्र कार्य करुन निवृत्त झालेल्या सैनिकांचा सैनिक पतसंस्था आणि इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग-सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. हा सोहळा १४ एप्रिल सकाळी ११.०० वा. गवळी तिठा येथील वैश्य भवनात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सन २०१७ ते सन २०२१ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सर्व सैनिकांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सैनिक पतसंस्थेचे चेअरमन शिवराम जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ आणि इंडियन एक्स सर्व्हिसेस लिगचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे यांनी दिली आहे.
या गौरव सोहळ्यासाठी सावंतवाडीचे आमदार व माजी वित्त व गृहराज्यमंत्री दिपक केसरकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री . मनिष दळवी व इतर मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील निवृत्त सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र व सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देवून गौरव केला जाणार आहे. तरी निवृत्त सैनिकांप्रती आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी जिल्हाभरातील सर्व माजी सैनिक त्यांचे कुटुंबिय , हितचिंतक व मित्रमंडळी तसेच देशप्रेमी नागरीकांनी याप्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.