You are currently viewing कासार्डेतील भिषण अपघातात दोघां दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यु

कासार्डेतील भिषण अपघातात दोघां दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यु

अपघाताची भिषणता अतिभयानक:- देहाची छिन्नविछिन्न अवस्था

तळेरे-प्रतिनिधी

कासार्डे तिट्टापासून काही अंतरावर जांभुळवाडी येथे असलेल्या उड्डाणपुलाच्या प्रारंभी सर्विस रोडकडे जात असताना होंडा अॅक्टिवा गाडीला गोवा- कणकवलीहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या भगवती ट्रॅव्हलच्या लक्झरी बसने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार निवृत्ती घाडी आणि सहप्रवासी रजनी घाडी यांचा जागीच मृत्यू झाला. तर होंडा ॲक्टिवा गाडीला तब्बल ३०० मीटर फरफटत नेल्याने तिचा चक्काचूर झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत निवृत्ती सोनू घाडी( वय 50 वर्षे) राहणार पेंढारी (घाडीवाडी) ता.देवगड यांच्या पत्नीचे कासार्डे तिठ्ठा येथे नम्रता लेडीज टेलर, नामक कपडे शिवण्याचे व तयार कपडे विकण्याचे दुकान आहे.सध्या ते याच परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते.
रविवारी रात्री आपले नातेवाईक मयत रजनी रमेश घाडी (वय ४५वर्षे)यांना आपल्या दुचाकी होंडा अॅक्टिवा MH-07- F- 21 13 या गाडीवरून घेऊन कासार्डे हायस्कूलच्या समोरील सर्विस रोडने येऊन महादेव मार्बल जवळचा मिटलकट क्रास करुन आपल्या राहत्या घरी विजयदुर्ग रोडवर असलेल्या. रात्रो अंदाजे ९.४५ वा. जात होते. मात्र त्याच वेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी भगवती ट्रॅव्हल्सची GA.03-N-6577. ही लक्झरी भरधाव वेगाने येऊन समोरच धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

*दुचाकीस्वारांना २०मीटर लक्झरीने नेले फरफटत!*

लक्झरी गाडीची धडक इतकी जोरदार होती की होंडा अॅक्टिवा लक्झरी च्या दर्शनी भागात बोनेटला अडकली तर दुचाकीस्वार निवृत्ती घाडी व रजनी घाडी या दोघांना फरपटत तब्बल २० मीटर पर्यंत नेल्याचे निदर्शनास येत असून, ॲक्टिवा गाडीला पुलावरून पलीकडच्या बाजूला अंदाजे ३०० मीटरपर्यत लक्झरीत अडकलेल्या स्थितीत घेऊन गेला आहे.दुचाकी बोनेटच्या खालील भागात अडकल्याने आणि प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने, अपघातानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या चालकाला अखेरीस नाईलाजास्तव गाडी थांबवणे भाग पडले ,अपघाताची भीषणता लक्षात घेऊन आणि घाबरून तो स्वतः मात्र लागलीच पसार झाला.

*दुर्घटनाग्रस्त व्यक्तींची छिन्नविछिन्न अवस्था!*

मयत निवृत्ती सोनू घाडी यांनी हेल्मेट घातलेले असतानाही लक्झरीच्या धडकेने त्यांची पूर्ण मान चिरली होती .तर तोंड पिळवटून मागच्या बाजूला वळलेले होते. आणि हेल्मेटचा चक्काचूर होऊन रस्त्याच्याकडेला पडले होते. तर त्यांच्यासोबत सहप्रवासी असलेल्या रजनी रमेश घाडी यांच्या पोटावरून चाक गेल्याने अगदी विद्रूप अवस्था झाली होती. आणि जवळ जवळ २० मीटर फरपटत नेल्याने याठिकाणी रक्ताचा सडा हायवेवर पडलेला होता.
वास्तविक रविवारी रात्री पावसामुळे कासार्डे परिसरातील लाईट गेली होती. रस्त्यावर पुर्ण काळोख होता .त्यात दुचाकीस्वार निवृत्ती घाडी हे रस्ताक्रॉस करीत असलेले ठिकाण वळणदार असून अत्यंत धोकादायक आहे .शिवाय तेथे अनधिकृत मिडलकट रस्ता असल्याने लक्झरी गाडीच्या ड्रायव्हरला ते दिसले नसावे किंवा गाडीचा वेगही खूप असल्याने जोरदार धडक बसली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या धडकेच्या आवाजाने आणि अपघातग्रस्त दोघांच्याही जोरदार ओरडण्याने आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी धावले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
काळोखातही मदत करण्यासाठी कासार्डे पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर ,
संजय नकाशे, प्रशांत राणे ,प्रवीण मत्तलवार ,
हर्षवर्धन रेते—पाटील, व कासार्डेचे अनेक ग्रामस्थांनी धाव घेतली. तर पोलीस निरीक्षक सचिन ओंधळेकर. डीवायएसपी कांबळे ,पोलीस उपनिरीक्षक व पोलीस नाईक चंद्रकांत झोरे, ट्राफिक हवालदार एपीआय अरुण जाधव ,आदींनी घटनास्थळी येऊन रीतसर पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मयतांना कणकवली हॉस्पिटल येथे घेऊन गेले असून कणकवली पोलिस स्थानकात मार्फत अधिक तपास केला जात आहे.

1) मयत निवृत्ती घाडी

१)अपग्रस्त लक्झरी व या लक्झरीसोबत फरफटत बोनेटमध्ये अडकलेली अॅक्टिवा दुचाकी दिसत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा